एक्स्प्लोर

Tarun Majumdar Death : प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण मजुमदार (Tarun Majumdar) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Tarun Majumdar Death : बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार (Tarun Majumdar) यांचे आज (सोमवार) कोलकाता (Kolkata) येथील रुग्णालयात निधन झाले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे तरुण मजुमदार हे आकर्षक कथांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मजुमदार यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सरकारी एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले. 1985 मध्ये तरुण मजुमदार यांनी अलोर पिपाशा या चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

प्रसिद्ध कलाकारांसोबत तरुण मुजमदार यांनी केलं काम

उत्तम कुमार, सुचित्रा सेन, छबी बिस्वास, सौमित्र चटर्जी आणि संध्या रॉय या प्रसिद्ध कलाकारांसोबत तरुण मजुमदार यांनी काम केलं. 

या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती 

1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या बालिका बधू या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. तसेच त्यांच्या कुहेली (1971), श्रीमन पृथ्वीराज (1972) and दादर कीर्ती (1980) , गणदेवता, आलो या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचा गणदेवता हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला बंगाली चित्रपट ठरला. 

अनेक पुरस्कारांनी करण्यात आलं सन्मानित

तरुण मजुमदार यांना 1990 मध्ये पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2021 मध्ये जीवनगौरव पुरस्कारासह पाच फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

2015 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये तरुण मजुमदार यांनी त्यांच्या चित्रपटांबाबत सांगितलं, 'मला नेहमीच मानवी नातेसंबंध आणि मूल्ये या गोष्टींबद्दल उत्सुकता वाटत होती. मला वाटते की मी मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या मला अधिक चांगल्या प्रकारे समजतात.'

हेही वाचा:

 
 

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget