Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अस्मोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदला गावात असलेल्या हसनेन पब्लिक प्रायव्हेट स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराची बाल्कनी अचानक कोसळली आणि तिथे उपस्थित असलेल्या तीन मुलांखाली चिरडली गेली.

An 8 year old child died after a school canopy: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान एक मोठा अपघात घडला. अस्मोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदला गावात असलेल्या हसनेन पब्लिक प्रायव्हेट स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराची बाल्कनी अचानक कोसळली आणि तिथे उपस्थित असलेल्या तीन मुलांखाली चिरडली गेली. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोन मुले जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी (डीएम), पोलीस अधीक्षक (एसपी), उप-जिल्हाधिकारी (एसडीएम), सीओ आणि तहसीलदार यांच्यासह शिक्षण विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
संभल में स्वतंत्रता दिवस कार्यक्रम के दौरान स्कूल का छज्जा गिरने से 8 साल के बच्चे की मौत हो गई। दो बच्चे घायल हो गए, जिन्हें अस्पताल में भर्ती कराया गया है। हादसा मुख्यालय से 40 किलोमीटर दूर असमोली थाना क्षेत्र के मदाला फतेहपुर गांव स्थित अलहसनैन पब्लिक स्कूल में हुआ #Sambhal pic.twitter.com/hssBvkUVid
— Arun (आज़ाद) Chahal 🇮🇳 (@ArunAzadchahal) August 15, 2026
दुसरीकडे, लखनौमध्ये एक रस्ते अपघात झाला होता, ज्यात एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन उलटली आणि चार मजुरांचा चिरडून मृत्यू झाला होता. हा अपघात शनिवारी सकाळी गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपूर महामार्गावरील गंगागंजजवळ घडला. विटभट्टी कामगारांना घेऊन जाणारी एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रितपणे उलटली, ज्यात चार कामगार चिरडून ठार झाले. दरम्यान, काल रात्री उशिरा रतलाम येथील मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या






















