'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
देवेंद्र फडणवीसांनी दिमागी नक्षल म्हणत काँग्रेस नेत्यांवर टीका केली. त्यावर, हर्षवर्धन सपकाळ यांनी पलटवार केला आहे.

मुंबई : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाल संबोधित केले. यावेळी, पंतप्रधान म्हणाले की,"सशस्त्र नक्षलवादी आता नाहीत, पण दिमागी नक्षलवादी संधीची वाट पाहत आहेत. ते समाजाची दिशाभूल करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत आहेत. दुसरीकडे काँग्रेस (congress) मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, वंदे मातरमला सोनिया गांधींनी विरोध केल्याचं सांगत भाजप नेत्यांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही या व्हिडिओवरुन काँग्रेसवर टीका केली. त्याला, काँग्रेस नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेस आणि वंदे मातरम् या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. त्यांच्या डोक्यात अराजकता आहे, ती दिसत आहे. काँग्रेस कार्यक्रमात ते आज दिसले. वंदे मातरम् वाजवण्याचे आदेशात म्हटलं आहे. तरीही पूर्ण वंदे मातरम वाजवले म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत, हा दिमागी नक्षलवाद आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पलटवार केला.
देवेंद्र फडणवीसांनी दिमागी नक्षल म्हणत काँग्रेस नेत्यांवर टीका केली. त्यावर, त्यांची पितृसंस्था स्वातंत्र्यसंग्रामात नव्हती, त्यांचं स्वातंत्र्याकरता कोणतंही योगदान नाही, त्यांनी अशाप्रकारे बोलणं हास्यास्पद आहे. नरेंद्र मोदींनी 12 वर्षात काय केलं? याचा त्यांनी लेखाजोखा द्यावा, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिमागी नक्षल म्हणत केलेल्या टीकेवर दिली. प्रकरण काय, विषय काय आणि टीका काय करताय, टीका करणाऱ्यांचं मानसिक दिवाळं निघाल आहे. काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात सोनियाजींनी मल्लिकार्जुन खरगेंना खुर्ची देण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांनी वंदे मातरमच्या आडून काँग्रेसवर टीका करणे अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
व्हिडिओवर स्पष्टीकरण
सध्या व्हिडीओमध्ये केलेला दाव्यात तथ्य नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांना उभं राहण्याचा त्रास आहे. त्या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण पाहिलेलं आहे की, या अगोदर ही खर्गे साहेब यांना उभ राहावं लागलं होतं त्यावेळी त्यांना त्रास झाला होता. त्यामुळे वंदे मातरमच्या (Vande Matram) आडून असं करण हे त्यांना (भाजपला) अशोभनीय आहे. वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरवात वंदे मातरम ने होते. वंदे मातरम हा काँग्रेसचा मंत्र आहे. त्यामुळे भाजप, आरआरएस, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभेने आम्हाला शहाणपणा शिकवू नये. असेही ते म्हणाले.
नेमकं काय घडलं
दरम्यान, 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर संपूर्ण 'वंदे मातरम' गायल्याबद्दल सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतल्याचा दावा केला जात आहे. भारतीय जनता पक्षाने यावर टोला लगावला आहे. यावर काँग्रेस पक्षाने उत्तर दिले की, संपूर्ण 'वंदे मातरम' गायले गेले आणि कोणीही त्यात व्यत्यय आणला नाही.
12 वर्षांत भाषणात जे बोलले, त्यापैकी काय?
लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याला लोकसभा विपक्ष नेते राहुल गांधी अनुपस्थित होते. राहुल गांधींच्या अनुपस्थितिवरही हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका मांडली. गेल्या 12 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे जे बोलले ते त्यांनी केलं का? प्रत्येक वेळेला त्यांनी दोन-दोन भाषणं केली, हजारो तास भाषणं केली, त्यातलं त्यांनी काय साध्य केलं? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला. तसेच, या सगळ्याची समीक्षा झाली पाहिजे. मात्र, त्यापासून विषय भरकटवण्यासाठी असे मुद्दे पुढे आणले जात आहेत, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















