Kishore Das : अभिनेता किशोर दासचे निधन; वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेता किशोर दासचे (Kishore Das) निधन झालं आहे. चैन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता.
Kishore Das : आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे (Kishore Das) निधन झालं आहे. किशोर दासनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. चैन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी किशोरनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन किशोरनं त्याला जाणवत असलेल्या समस्यांबाबत सांगितलं होतं.
किशोरनं शेअर केली होती पोस्ट
किशोरनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं होतं की त्याचा किमोथेरेपीचा चौथा टप्पा सुरु होता. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'जे तुम्हाला मारत नाही ते तुम्हाला मजबूत बनवते. सध्या किमोथेरेपीचा चौथा टप्पा सुरु आहे. तुम्हा वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. या दिवसात मला काही समस्या जाणवत आहेत. मला उल्टी होणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे हे साइड इफेक्ट्स जाणवत आहेत. मी डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषध देखील घेऊ शकत नाही. मी लवकर यामधून लवकर बरे होण्याची आशा व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा.'
View this post on Instagram
300 पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये केलं काम
किशोरनं 300 पेक्षा जास्त म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. आसाममधील 'turrut turut'या प्रसिद्ध गाण्यामुळे किशोला लोकप्रियता मिळाली. तसेच बंधुन और बिधाता या सीरियलमधील किशोरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. किशोरनं इंडियाज गॉट टॅलेंच आणि डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामध्ये देखील सहभाग घेतला होता. 2020-21 मध्ये, किशोर दासनं सर्वात लोकप्रिय अभिनेत्याचा एशियानेट आयकॉन पुरस्कार मिळाला पटकावला होता.
हेही वाचा:
Ketaki Chitale : मारहाण झाली, विनयभंगही झाला!, तुरुंगात जाताना केतकी चितळेसोबत काय काय घडलं?