Peter Brook: ‘पॅरिस’च्या रंगमंचावर ‘महाभारत’ सादर करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक पीटर ब्रुक यांचे निधन, 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Peter Brook Passes Away: जगप्रसिद्ध ब्रिटिश थिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रुक (Peter Brook) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.
Peter Brook: जगप्रसिद्ध ब्रिटिश थिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रुक (Peter Brook) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. ब्रुक यांनी दोन वेळा मानाचा ‘टोनी पुरस्कार’ पटकावला होता. ते फ्रान्समध्ये स्थायिक झाले होते. पीटर ब्रुक यांचा जन्म 1925 मध्ये लंडनमध्ये झाला होता. ब्रुक यांचे वडील एका कंपनीचे संचालक होते. तर, आई शास्त्रज्ञ होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फिल्म स्टुडिओमध्ये प्रवेश घेतला. ऑक्सफर्डमधून इंग्रजी आणि परदेशी भाषांमध्ये पदवी प्राप्त केली. अगदी महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘डॉक्टर फास्टस’ हे नाटक दिग्दर्शित केले होते.
ब्रुकचे प्रकाशक निक हर्न बुक्स यांनी रविवारी एक निवेदन जारी करत ही दुःखद बातमी सगळ्यांना सांगितली. यात त्यांनी म्हतके की, ‘त्यांनी एक विलक्षण कला वारसा मागे सोडला आहे.’ फ्रेंच मीडिया रिपोर्टनुसार, ब्रुक यांचे शनिवारी पॅरिसमध्ये निधन झाले.
जगभरात पसरलेली ख्याती!
1963मध्ये पीटर ब्रुक यांनी त्यांच्या ‘लॉर्ड ऑफ द फाइल्स’ या सर्वोत्कृष्ट नाट्यकृतीचे चित्रपटात रूपांतर करत, त्याच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली होती. ब्रुक यांना त्यांच्या तब्बल सात दशकांच्या कारकिर्दीत ‘ऑलिव्हर पुरस्कार’, ‘एमी’ आणि ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जगविख्यात कलाकृतींमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. ब्रुक यांची ख्याती जगभरात पसरली होती. त्यांना जपानने प्रीमियम इम्पेरिअल आणि इटलीने प्रिक्स इटालिया हे मानाचे सन्मान प्रदान केले होते. 2019 मध्ये स्पेनच्या राजकुमारी अस्टुरियास यांनीही त्यांचा गौरव केला होता.
पॅरिसच्या रंगमंचावर सादर केले ‘महाभारत’
1985 मध्ये व्हिएतनाममध्ये युद्ध सुरू असताना ब्रुक यांनी पॅरिसच्या रंगमंचावर ‘महाभारत’ सादर केले होते. तब्बल नऊ तास प्रेक्षक हे नाटक पाहत राहिले. नाटकाच्या अखेरीस ब्रुक यांनी विचारले की युद्धाने संघर्ष संपुष्टात येऊ शकतो का? शांतता आणि युद्ध यातील एक निवडण्याचा पर्याय नेते आणि लोकांकडे आहे का? त्यामुळे संपूर्ण जग उध्वस्त होते. ‘महाभारत’ ही अशाच करोडो प्रेतांची कथा आहे आणि मुख्य म्हणजे यात युधिष्ठिर शेवटी म्हणतो की 'हा विजय पराभव आहे' आणि हेच युद्धाचे खरे सत्य आहे. 2021मध्ये, भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले होते.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या