Superstar Of Indian Cinema: 900 फिल्म्समध्ये केलं काम, 700 मध्ये लीड रोल अन् 85 हिरोईन्सचा हिरो; भारतीय सिनेसृष्टीचा एकुलता एक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
Superstar Of Indian Cinema: या हिरोनं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत शंभर-दोनशे नव्हे तर, तब्बल 900 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या 900 चित्रपटांपैकी 700 चित्रपट असे होते, ज्यात तो मुख्य भूमिकेत दिसला.

Superstar Of Indian Cinema: सिनेस्टार (Cinestar) आणि त्यांच्या गोष्टी नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरतात. बऱ्याचदा सिनेस्टार्सचे काही आकडे जाहीर केले जातात. हे आकडे सांगतात की, त्यांनी एका वर्षात किती चित्रपटांमध्ये काम केलं आहे, किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांनी किती सुपरडुपर हिट चित्रपट दिले, याची आकडेवारी मांडली जाते. जसं अक्षय कुमारबाबत (Akshay Kumar) असं म्हटलं जातं की, एकेकाळी तो एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करणारा स्टार होता. पण असं करुनही अक्षय कुमार एका हिरोच्या विक्रमापासून मात्र दूरच राहिला. या हिरोनं शंभर किंवा दोनशे नाहीतर आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जवळपास 900 फिल्म्समध्ये काम केलं होतं. या 900 फिल्म्सपैकी 700 फिल्म्स अशा होत्या की, ज्यामध्ये तो लीड रोलमध्ये दिसून आला होता. तर, तब्बल चाळीस फिल्म्समध्ये या सुपरस्टारनं डबल रोल केला होता.
साऊथ फिल्म्समधून बनले सुपरस्टार
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, त्याचं नाव प्रेम नजीर (Prem Nazir) आहे. प्रेम नजीर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटांपासून केली. एका वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या संख्येचा सर्वात मोठा विक्रम प्रेम नजीर यांच्याच नावावर आहे. काही वर्ष अशी होती, जेव्हा प्रेम नजीर यांचे 39-39 चित्रपट प्रदर्शित झाले. मल्याळम उद्योगाला जगभरात ओळख मिळवून देण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. जास्त चित्रपट केल्यानं त्यांच्या अभिनयावर कधीही परिणाम झाला नाही. असं म्हटलं जातं की, नजीर इतकी रियॅलिस्टिक अॅक्टिंग करायचे की, चित्रपट निर्मातेही आश्चर्यचकित व्हायचे.
'या' चित्रपटातून डेब्यू
प्रेम नजीर यांनी आपल्या संपूर्ण फिल्मी करिअरमध्ये 40 फिल्म्समध्ये डबल आणि ट्रिपल रोल केला होता. या दरम्यान त्यांनी 85 हिरोइन्ससोबत स्क्रिन शेअर केली होती. त्यांचा पहिला चित्रपट 1952 साली रिलीज झाला होता, ज्याचं नाव होतं मरूमकल. यानंतर, त्यांचा 'विसापिंटे विली' हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामुळे नजीर घराघरात पोहोचले. प्रेम नझीर यांचं खरं नाव अब्दुल खादीर होतं. पण चित्रपट जगात त्यांना प्रेम नजीर म्हणून ओळखलं जायचं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























