Pushpa 2 Box Office Collection: सगळीकडे नंबर एक, पण फक्त याच बाबतीत सुपरफ्लॉप ठरला 'पुष्पा 2'; ब्लॉकबस्टर म्हणत असा तर सर्वात आधी 'हे' जाणून घ्या!
Pushpa 2 Box Office Collection: पुष्पा 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे चित्रपट ब्लॉकबस्टर बनला, पण आपण सारे नेमकं इथेच चुकलो. खरं तर, ब्लॉकबस्टर असूनही, हा चित्रपट काही ठिकाणी फ्लॉप झाला, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही.

Pushpa 2 Box Office Collection: 5 डिसेंबर 2024 ही तारीख भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नेहमीच सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) एक वादळ आलं होतं. त्या वादळाचं नाव 'पुष्पा 2' (Pushpa 2). या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुरळा उडवून दिला, एवढंच नाहीतर भल्या भल्या बिग बजेट सिनेमांनाही पाणी पाजलं. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) या चित्रपटाचं फक्त नाव जरी कानावर पडलं, तरीसुद्धा आपल्याला विक्रमांचे डोंगरच्या डोंगर दिसू लागतात.
आजवरचे बॉक्स ऑफिसचे जास्ती जास्त विक्रम 'पुष्पा 2'नं मोडीत काढलेत. पहिल्या दिवशी, पहिल्या आठवड्याच्या शेवटी आणि पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाईचे सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स हे 'पुष्पा 2'च्याच नावावर आहेत. यानंतर, हा चित्रपट सर्वात जलद 500 कोटींची कमाई करणारा चित्रपट बनला आणि नंतर 600 कोटींचा टप्पा ओलांडणारा सर्वात जलद चित्रपट बनला. किंवा 700 कोटी आणि 800 कोटींचे आकडे विसरून जा, हा चित्रपट 1200 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला.
पण, तुम्हाला हे कदाचितच माहीत असेल की, सुपरडुपर हिट, ब्लॉकबस्टर अशी अनेक विशेषणं नावापुढे लागूनही 'पुष्पा 2' एका ठिकाणी मात्र, सुपरफ्लॉप ठरला. कुठे आणि कसा जाणून घेऊयात सविस्तर...
View this post on Instagram
ब्लॉकबस्टर असूनही, 'पुष्पा 2' नेमका इथेच फ्लॉप झाला?
'पुष्पा 2' सर्वकालीन ब्लॉकबस्टर असूनही, एका क्षणी तो फ्लॉप झाला. तुम्हाला हे वाचून विचित्र वाटेल, पण हे 100 टक्के खरं आहे आणि एक कटू सत्य देखील आहे. कसं ते जाणून घेऊयात सविस्तर...
'पुष्पा 2' हा चित्रपट 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि सॅक्निल्क इंडियाच्या मते, या चित्रपटानं बाहुबली 2 च्या 1030.42 कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शन मागे टाकलं आहे. 'पुष्पा 2'नं 1234.1 कोटी रुपयांची कमाई करून त्याला मागे टाकलं, ज्यामध्ये 246 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
पण इथे एक अडचण अशी आहे की, चित्रपटाच्या एकूण कमाईचा मोठा भाग फक्त हिंदी प्रेक्षकांकडून आला. या चित्रपटानं हिंदीमध्ये आतापर्यंत एकूण 812.14 कोटी रुपये कमावले आहेत, म्हणजेच केवळ हिंदी प्रेक्षकांनीच चित्रपटाला इतकी कमाई करुन दिली आहे. जर दक्षिणेकडील प्रेक्षक नसता तरी हा चित्रपट खूप हिट झाला असता.
आता जर आपण साऊथमध्ये चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर ते खूप निराशाजनक आहे. प्रत्यक्षात, चित्रपटानं तेलुगूमध्ये 341.48 कोटी, तमिळमध्ये 58.56 कोटी, कन्नडमध्ये 7.77 कोटी आणि मल्याळममध्ये 14.15 कोटी रुपये कमावले. जर आपण एकूण साऊथ कलेक्शन पाहिलं तर ते फक्त 421.96 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. त्यामुळे सुकुमार, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल हिंदी प्रेक्षकांचे आभार मानले पाहिजेत. कारण चित्रपट सुपरडुपर हिट करण्यासाठी हिंदी प्रेक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
पुष्पाच्या कमाईपैकी 65 टक्के हिस्सा हिंदी प्रेक्षकांचाच, उर्वरित दक्षिणेतील प्रेक्षकांचा
जर आपण हिंदी भाषेतील सिनेमाची कमाई पाहिली तर, त्यांनी कमाईच्या 65.80 टक्के रक्कम दिली आहे. उर्वरित 34.19 टक्के दक्षिणेतील चार भाषांमधून करण्यात आली. म्हणजेच, जर हा चित्रपट फक्त साऊथच्या पाठिंब्यानं प्रदर्शित झाला असता तर, तो सुपरफ्लॉप ठरला असता. कलेक्शनवरून दिसून येतं की, चित्रपटाला दक्षिणेत त्याचं बजेटही वसूल करता आलेलं नाही.
'पुष्पा 2'च्या निर्मात्यांची 'ती' खेळी यशस्वी ठरली...
'पुष्पा 2'च्या निर्मात्यांना समजलं होतं की, त्यांचा मागील चित्रपट 'पुष्पा द राईज'नं हिंदीतून 106.35 कोटी रुपये कमावले होते. जे त्यावेळीही चित्रपटाच्या एकूण कमाईच्या सुमारे 50 टक्के होते. म्हणूनच हिंदी भाषिक राज्य बिहारची राजधानी पाटणा इथे चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यानंतर, चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र पोहोचली. हेच कारण होतं की, प्रेक्षक चित्रपटाशी जोडले गेले आणि चित्रपटाला इतकी कमाई करता आली.























