Superman Box Office Collection: 1900 कोटींचं बजेट, 3 दिवसांतच कमावले 1865 कोटी; 'या' हॉलिवूड सिनेमानं भारतीय बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड फिल्मला पाणी पाजलं
Superman Box Office Collection: 11 जुलै रोजी, 'मलिक' आणि 'आँखों की गुस्ताखियां' या बॉलिवूडपटांना मागे टाकणारा हॉलिवूड चित्रपट 'सुपरमॅन'नं जगभरात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Superman Box Office Collection: 11 जुलै रोजी रिलीज झालेल्या 'सुपरमॅन' फिल्मनं (Superman Movie) 1000 कोटींचा गल्ला पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सॉरशिपबद्दल बरीच चर्चा रंगली होती. दिलजीत दोसांजचा (Diljit Dosanjh) नव्या सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या कट्सचा सामना करावा लागला होता. तसेच, नुकताच रिलीज झालेला हॉलिवूड सिनेमा 'सुपरमॅन' (Hollywood Movie Superman) फिल्मलाही रिलीजपूर्वी सीबीएफसीकडून कट्सचा सामना करावा लागला होता. यासाठी त्याला टीकेचा सामनाही करावा लागलेला. पण, या कट्सचा बॉक्स ऑफिसवरील सिनेप्रेमींच्या प्रेमावर परिणाम होत नाही, कारण सुपरमॅननं भारतात 25 कोटींचा आकडा ओलांडला आहे, तर जगभरात 1865 कोटींचा आकडा ओलांडला आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 11 जुलै रोजी भारतात प्रदर्शित झालेल्या 'सुपरमॅन' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 24.94 कोटींची कमाई केली. जगभरात हा आकडा 1865 कोटींवर पोहोचला आहे. दुसरीकडे, त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'मलिक' सिनेमानं 14.09 कोटींची कमाई केली आहे. तर 'आंखों की गुस्ताखियां' फक्त 1.23 कोटींची कमाई करू शकला.
जेम्स गनच्या 'सुपरमॅन'ला UA 13 प्लस रेटिंग मिळालं आहे. तर 'सुपरमॅन' आणि 'लोइस लेन'मधील 33 सेकंदांचा किसिंग सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला आहे. यावर सोशल मीडियावर खूप संताप व्यक्त होत आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या युजर्सनी CBFC च्या डबल स्टँडर्डवर प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटलंय की, हिंसाचार, बोल्ड रोमान्स आणि मॅच्युअर थीम असूनही, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड सारख्या चित्रपटांना क्वचितच समान पातळीची तपासणी करावी लागते. दरम्यान, 1900 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'सुपरमॅन'नं फक्त 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 1965 कोटी रुपये कमावले आहेत.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :























