(Source: ECI | ABP NEWS)
Bollywood Actress Struggle Life: 240 कोटींच्या बिझनेस एम्पायरची मालकीण, डेब्यू फिल्म 'सुपरफ्लॉप', तरीही आज इंडस्ट्रीवर करतेय राज्य; सुपरस्टारसोबत बांधलीय लग्नगाठ
Bollywood Actress Struggle Life: आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच कठीण स्पर्धा देत असे. आता तिला व्यवसायातही खूप यश मिळत आहे.

Bollywood Actress Struggle Life: बॉलिवूडची (Bollywood News) अशी एक अभिनेत्री, जिची डेब्यू फिल्म सुपरडुपर फ्लॉप ठरली, पण तरीसुद्धा तिनं 240 कोटींचं साम्राज्य उभं केलं. आज ती फिल्म इंडस्ट्रीतल्या एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून आहे. तर हिचा नवराही बॉलिवूडच्या टॉप सुपरस्टार्सपैकी (Bollywood Superstars) एक आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव कतरिना कैफ (Katrina Kaif). आजवर बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री कतरिना कैफला तिच्या सुरुवातीच्या काळात मात्र, दुर्लक्षित केलं जायचं. ज्यावेळी तिनं पॅक-अप करुन जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिचा 'नमस्ते लंडन' (2007) हा सिनेमा विशेष गाजला. प्रेक्षकांनी कतरिनाची अभिनय क्षमता ओळखली आणि सौंदर्यापलिकडेही कतरिनाकडे अभिनय कौशल्य आहे, याची प्रचिती अख्ख्या सिनेसृष्टीला आली.
काही वर्षांनंतर, जेव्हा कतरिना कैफ 'भारत', 'झिरो', 'राजनीती', 'एक था टायगर' सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आणि तिच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली, त्यावेळी तिनं 2019 मध्ये तिचा ब्युटी ब्रँड 'के ब्युटी' लाँच करून तिची 'ब्यूटिफ गर्ल' म्हणून असणारी इमेज एका बिझनेस वुमनमध्ये बदलली. पण, कतरिना एक टॉप अभिनेत्री ते यशस्वी बिझनेस वुमन महिला कशी बनली?
कतरिनानं उद्योगपती म्हणून केली सुरुवात
ब्रँड लाँच करण्यापूर्वी, कतरिनानं 2018 मध्ये रिटेल कंपनी Nykaa सोबतच्या कोलॅब बिझनेसमध्ये 2.04 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 2021 पर्यंत ही गुंतवणूक 22 कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. यातून कतरिनाची बिझनेसवुमन म्हणून असणारी जाण दिसून आलीच नाही तर, ऑनलाईन रिटेल कंपनीसोबतच्या तिच्या आगामी ब्यूटी वेंचरचा भक्कम पायाही घातला गेला.
मेकअप मार्केटची वाढती मागणी आणि स्पर्धात्मक असूनही, कतरिनानं एकाच निर्णयानं वेगळ्या वळणावर उभं राहण्यात यश मिळवलं. 2019 मध्ये Nykaa सोबतच्या सहकार्यानं ब्रँड लाँच केला. ही तिची कल्पना होती आणि लवकरच ती देशातील सर्वात जास्त मागणी असलेल्या मेकअप ब्रँडपैकी एक बनली.
कतरिनाच्या ब्रँडची किंमत 240 कोटी रुपये
2025 मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, फक्त सहा वर्षांतच कतरिनाच्या ब्रँडनं देशातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक ब्रांड्समध्ये आपली जागा तयार केली. कतरिनाच्या ब्रँडनं 2025 मध्ये 240 कोटी रुपयांचा रेवेन्यू मिळवला.
कतरिनाचा प्रॉपर्टी पोर्टफोलियो
स्वतः बिझनेसवुमन म्हणून सिद्ध करणाऱ्या कतरिना कैफकडे भारतात आणि परदेशातही अने प्रॉपर्टी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अंधेरी पश्चिमेत असणाऱ्या पॉश मौर्या हाऊसमध्ये तिचं दुमजली अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत 17 कोटी रुपये आहे. अभिनेता विक्की कौशलशी लग्न करण्यापूर्वी कतरिना इथेच राहायची. तसेच, तिच्याकडे लंडनमध्ये जवळपास 7.2 कोटी रुपयांचं एक घरही आहे. सध्या कतरिना विक्की कौशलसोबत त्याच्या जुहूमधल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. यावर्षी विक्कीनं आपल्या अपार्टमेंटचा भाडे करार रिन्यू केला आहे. विक्की कौशल तीन वर्षांत तब्बल 6.2 कोटींचं भाडं भरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























