'मी जास्त बोलू शकणार नाही..', बॉर्डर 2 गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल भावुक; वडिलांची आठवण काढत म्हणाला..
Sunny Deol Pays Tribute to Late Father Dharmendra: बॉर्डर 2 च्या गाण्याच्या लाँचवेळी अभिनेता सनी देओल भावूक झाले. सनी देओल यांनी वडील धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Sunny Deol Pays Tribute to Late Father Dharmendra: सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉर्डर 2 या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. बॉर्डर 2च्या टीमने चित्रपटाच्या प्रोमोशनला सुरूवात केली आहे. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शुक्रवारी या चित्रपटातील पहिल्या गाणे लाँच करण्यात आले. जैसलमेरमध्ये 'घर कब आओगे', हे गाणे लाँच करण्यात आले. या कार्यक्रमात चित्रपटातील स्टारकास्ट देखील उपस्थित होती. तसेच अभिनेता सनी देओल देखील उपस्थित होता. गाण्याच्या लाँच कार्यक्रमात सनीने त्याचे वडील स्वर्गीय अभिनेता धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. या लाँच कार्यक्रमादरम्यान, सनी देओलचे डोळे पाणावले होते. यावेळी सनी देओल भावनिक झाले असल्याचं पाहायला मिळालं. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमात सनी देओलने अनेक वर्षांपूर्वी शूट केलेल्या बॉर्डर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने असेही सांगितले की, तो त्याचे वडील धर्मेंद्र यांच्या हकीकत चित्रपटापासून प्रेरित झाला होता. त्यानं या कार्यक्रमादरम्यान, वडिलांची आठवण काढली.
बॉर्डर 2 चित्रपटातील गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात सनी देओल म्हणाला, "तुम्ही सर्व जण कसे आहात?.. मी जेव्हापासून बॉर्डर चित्रपटाचा एका भाग झालो आहे, तेव्हापासून मी तुमच्या परिवाराचा एक हिस्सा झालो आहे. मी बॉर्डर चित्रपट केला कारण, जेव्हा मी माझ्या वडिलांचा हकीकत चित्रपट पाहिला, तेव्हा मला हा चित्रपट प्रचंड आवडला होता. तेव्हा मी खूप लहान होतो. जेव्हा मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तेव्हा मी ठरवलं होतं की, मी देखील माझ्या वडिलांप्रमाणे हकीकतसारख्या चित्रपटात काम करेन. जी संधी मला मिळाली. मी जेपी दत्ता साहेबांशी बोललो. आम्ही ठरवलं होतं की, आपण या विषयावर एक चित्रपट बनवू. हा चित्रपट आपल्या सर्वांच्या ह्रदयात आहे", असं सनी देओल म्हणाला.
सनी देओल यावेळी भावनिक झाला होता. त्याने आपल्या वडिलांची आठवण काढत आपल्या भावनांना मोकळं केलं. तो म्हणाला, " मी जास्त काही बोलू शकणार नाही. माझे मन हादरले आहे", असं सनी भावूक होऊन म्हणाला. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. यानंतर धर्मेंद्र परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळला. धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 1 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. 'इक्कीस' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
बॉर्डर 2 हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झालेल्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, वरूण धवन. दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चाहते या चित्रपटाची आतुतेने वाट पाहत आहेत.
























