Sunny Deol : विवाहित असतानाही अमृता सिंहच्या प्रेमात पडलेला सनी देओल, ‘या’ अभिनेत्रींशीही जोडले नाव!
Sunny Deol : पहिल्या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमृता सिंह मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात एकत्र काम करत असताना, सनी देओल आणि अमृता एकमेकांना पसंत करू लागले.
Sunny Deol : बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलने (Sunny Deol) 1983 मध्ये 'बेताब' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पहिल्या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमृता सिंह मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात एकत्र काम करत असताना, सनी देओल आणि अमृता एकमेकांना पसंत करू लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या होत्या.
अगदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अमृता सिंह (Amrita Singh) आणि सनी देओलच्या भेटीगाठी सुरूच होत्या. पण, जेव्हा अमृताला सनी विवाहित असल्याचे समजले, तेव्हा तिने या नात्यातून माघार घेतली.
सनीने गुपचूप उरकलं लग्न!
खरं तर, पहिला चित्रपट 'बेताब' रिलीज होण्यापूर्वीच सनी देओलने पूजासोबत गुपचूप लग्न केले होते. अनेक वर्षे त्याने आपले लग्न गुप्त ठेवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांना सनीच्या करिअरच्या सुरुवातीला त्याच्या लग्नाची माहिती सर्वांना मिळावी, असे वाटत नव्हते. कारण, या गोष्टीचा त्याच्या फॅन फॉलोइंगवरही परिणाम होऊ शकला असता.
अमृतानंतर डिंपल कपाडियाची एण्ट्री!
त्याचवेळी अमृता सिंहशी नात तुटल्यानंतर अभिनेत्री डिंपल कपाडियाने (Dimple Kapadia) सनी देओलच्या आयुष्यात प्रवेश केला. हा तो काळ होता, जेव्हा डिंपल कपाडिया तिच्या वैवाहिक जीवनातील कलहामुळे पती राजेश खन्नापासून वेगळे राहत होती. त्याचवेळी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी 'मंजिल मंजिल' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल आणि सनीने गुपचूप लग्न करण्याचेही ठरवले होते. पण, जेव्हा डिंपलसोबतची सनीची असणारी जवळीक त्याची पत्नी पूजा देओलपर्यंत पोहोचली, तेव्हा तिने रागाने दोन्ही मुलांसह घर सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी सनीने त्याचे कुटुंब आणि डिंपलमधून कुटुंबाची निवड केली आणि डिंपलपासून अंतर ठेवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल आणि सनी देओलचे अफेअर सुमारे 11 वर्षे चालले होते.
हेही वाचा :
- ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, 'दफा कर'ची चाहत्यांमध्ये क्रेझ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha