(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
जगभरातील बॉक्स ऑफिसवर RRR ची जादू
एस. एस राजामौली यांचा 'आरआरआर' हा चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बाहुबलीनंतर RRR या एस.एस राजामौली यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 18 कोटींची कमाई केली आहे.
27 मार्चला साजरा होणाऱ्या जागतिक रंगभूमी दिनाविषयी जाणून घ्या
27 मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण
गेल्या काही दिवसांमध्ये काही बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं तिचं वांद्रा येथील घर सील केलं आहे. तसेच लाराच्या घराबाहेर मुंबई महापालिकेकडून मायक्रो कन्टेन्मेंट झोनचा फलक लावण्यात आला आहे.
टायगर श्रॉफच्या चाहत्यांमध्ये 'दफा कर'ची क्रेझ
टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सिनेमातील पहिले गाणं 'दफा कर' रिलीज झाले आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.
RRRचे IMDb रेटिंग पाहिलेत?
राजामौलींचा चित्रपट IMDb वर देखील चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला 9.2 IMDb रेटिंग मिळाली आहे. हे रेटिंग साडे सात हजारांहून अधिक लोकांच्या रिव्ह्यूववर आधारित आहे. 7,668 IMDb वापरकर्त्यांपैकी 80.9 टक्के वापरकर्त्यांनी चित्रपटाला 10 स्टार दिलेत, तर 4.9 टक्के लोकांनी 9चे रेटिंग्ज दिले आहे. त्याच वेळी, 8.4% लोकांनी चित्रपटाला रेटिंग देखील दिले आहे. मात्र, या तीन तास सात मिनिटांच्या चित्रपटाच्या रेटिंगमध्ये वाढत्या रिव्ह्यूमुळे येत्या काळात आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
संबंधित बातम्या
क्या यही प्यार है! हृतिक अन् सबाची एकमेकांच्या पोस्टवर 'प्रेमळ जुगलबंदी'
ABP Ideas of India: 'द कश्मीर फाइल्स''वरून बॉलीवूडमध्ये दोन गट पडेल आहे का? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला...
World Theatre Day 2022 : 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' ते 'सारखं काहीतरी होतंय', जागतिक रंगभूमी दिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha