ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
Aamir Khan : परफेक्टनिस्ट आमिर खान स्वत:ला परफेक्टनिस्ट मानत नाही.
Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता, निर्माता, मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पण गेले अनेक दिवस आमिर खान सोशल मीडियापासून दूर आहे. आमिर खानने आज एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या मंचावर आमिर म्हणाला,"कोरोनाकाळात आयुष्याबद्दल विचार करताना फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता".
आमिर खानला फिल्म इंडस्ट्री का सोडायची होती?
आमिर खान म्हणाला, "कोरोनाकाळात मला एकांतात विचार करण्याची संधी मिळाली. मी स्वत:बद्दल विचार करायला लागलो. या काळात आयुष्याबद्दल विचार करू लागलो. दरम्यान माझ्या लक्षात आलं, स्वत: साठी जगताना मी माझ्या जवळच्या लोकांना वेळच दिला नाही. मी प्रेक्षकांसोबत हसलो, रडलो पण माझ्या मुलांसोबत मात्र वेळ घालवू शकलो नाही.
आमिर पुढे म्हणाला,"सिनेमाने मला माझ्या कुटुंबापासून तोडलं असं वाटलं त्यामुळे मी फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच जर मी सांगितलं असतं की मी अभिनय क्षेत्र सोडले तर लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला असता. त्यामुळे मी कुठल्याही माध्यमाद्वारे लोकांना सांगितलं नाही. पण फिल्म इंडस्ट्री सोडल्याच्या तीन महिन्यानंतर माझ्या मुलांनी मला समजावलं की, मी इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीत काम करावं.
मुलं म्हणाली, गेल्या 30 वर्षांत तू आम्हाला एवढा वेळ दिला नाहीस जेवढा 3 महिन्यांत दिला आहेस. आता तू तुझं काम पुन्हा सुरू कर."
मी परफेक्टनिस्ट नाही
आमिर खान म्हणाला,"मी परफेक्टनिस्ट नाही. परफेक्टनिस्ट हे लेबल माझ्यासाठी अयोग्य आहे. पण एकदा लेबल चिकटलं की ते आयुष्यभर तसचं राहतं. माझं फक्त माझ्या कामावर प्रेम आहे".
संबंधित बातम्या
ABP Ideas of India: 'द कश्मीर फाइल्स''वरून बॉलीवूडमध्ये दोन गट पडेल आहे का? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला...
ABP Ideas of India: माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं, एबीपीच्या मंचावर 'पपॉन'ने केलं मनमोकळं
ABP Ideas of India: आता बॉलीवूड, टॉलीवूड हे शब्द वापरण्याऐवजी 'इंडियन फिल्म इंडस्ट्री' म्हणावं: करण जोहर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha