(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viju Mane : 'स्ट्रगलर साला'मध्ये इतक्या शिव्या खरचं गरजेच्या आहेत का? विजू माने म्हणाले , हे तर...
युट्युबर सध्या ट्रेंडींग असलेली 'स्ट्रगलर साला' या सिरिजविषयी दिग्दर्शक आणि लेखक विजू माने यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : विजू माने यांचा 'पांडू' (Pandu) या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली. तसेच हा सिनेमा प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडला होता. विजू माने (Viju Mane) हे युट्युबर असलेली 'स्ट्रगलर साला' या सिरिजचे देखील लेखन आणि दिग्दर्शन करत आहे. या त्यांच्या सगळ्या प्रवासाविषयी त्यांनी सौमित्र पोटे (soumitra pote) यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे.
विजू माने यांनी अनेक धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. पांडू, शर्यत, बायोस्कोप यांसारख्ये अनेक चित्रपट विजू माने यांनी दिग्दर्शित केले आहेत. पण सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे, ती त्यांची स्ट्रगलर साला ही वेब सिरिज तुफान गाजतेय. पण ही सिरिज सगळ्यात जास्त चर्चेत ठरतेय ते त्यामध्ये असलेल्या शिव्यांमुळे. याचसंदर्भात देखील विजू माने यांनी भाष्य केलं आहे.
तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू - विजू माने
स्ट्रगलर साला ही सध्या युट्युबर ट्रेंडींग असणारी सिरिज आहे. तसेच अनेकांच्या देखील पसंतीस ती पडत आहे. यावर बोलताना विजू माने यांनी म्हटलं की, हे एक माध्यम आहे, ज्यामुळे अनेकांचा मोठी संधी देखील मिळते. नवीन यामुळे टॅलेंट आम्हालाही कळतं. पण असं असलं तरीही आम्ही आजही ट्रोल होतोय. हा एपिसोड लिहिलेला असतो. त्यामध्ये अगदी मोजक्या ठिकाणी शिव्या असतात. यामध्ये कोणतीही प्रॅक्टिस करत नाही. जे येतं ते नैसर्गिक आहे. कॅमेरा बंद असतानाचा आम्ही कसे आहोत, हेच आम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला शिव्या आवडत नसतील तर नका बघू.
'दुसरं काहीतरी बघा'
आज अनेक चॅनल उपलब्ध आहेत. आस्था पासून अनेक चॅनल खूप कॉन्टेंट आहे. आम्ही जिथे आहोत त्या युट्युबरही पुढील अनेक वर्ष पाहता येईल, असा कॉन्टेट एका दिवसांत प्रदर्शित होतो, तो तुम्ही बघू शकता. पण स्ट्रगलर साला हा प्रयोग एक खूप साधा प्रयोग आहे, त्यामुळे जर तुम्हाला ते नसेल पटत, नसेल रुचत तर नका बघू, असंही विजू माने यांनी म्हटलं.
'आमचा तो प्रयत्न सपशेल अपयशी ठरला'
एक प्रयोग आम्ही केला होता, ज्यामध्ये जेवढ्या शिव्या आहेत, त्या सगळ्या आम्ही म्युट केल्या होत्या. हे केल्यानंतरही आम्हाला प्रचंड शिव्या पडल्या. तो आमचा प्रयोग सपशेल फसला. त्यामुळे आम्ही ठरवलं की हे जसं आहे, तसं दाखवायचं. त्याची प्रॅक्टिस कोणी करत नाही, आपण जसे बोलतो तसंच त्यामध्ये दाखवलं जातं, असं विजू माने यांनी म्हटलं.