Disney Plus Hotstar New Release: ना कोणती चर्चा, ना कसलंही प्रमोशन; डिज्नी प्लस हॉटस्टारवर गुपचूप आली थ्रिलर फिल्म, बजेटच्या 4 पट केली कमाई, क्लायमॅक्स तर...
Sookshmadarshini On Disney Plus Hotstar New Release Film : 11 जानेवारीपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'सूक्ष्मदर्शिनी' (Sookshmadarshini) हा नवा चित्रपट प्रदर्शित होत आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर त्याच्या बजेटपेक्षा 4 पट जास्त कमाई केली.

Sookshmadarshini On Disney Plus Hotstar New Release Film : ओटीटीमुळे (OTT Released) जग आणखी जवळ आलंय असं म्हणतात, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवे चित्रपट प्रदर्शित होत असतात. यामध्ये अनेक धमाकेदार वेब सीरिज (Web Series) आणि फिल्म्स (OTT Films) प्रदर्शित होत असतात. असाच एक चित्रपट 11 जानेवारीपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) रिलीज झाला आहे. या चित्रपटानं अगदी गपचूप ओटीटीवर एन्ट्री घेतली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, कोणत्याही प्रमोशनशिवाय रिलीज झालेल्या या चित्रपटानं बजेटपेक्षा तब्बल चार पट अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचं नाव सूक्ष्मदर्शिनी (Sookshmadarshini).
डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात आलेला सूक्ष्मदर्शिनी हा एक ब्लॅक कॉमेडी मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात बेसिल जोसेफ आणि नजरिया नाझिम फहाद मुख्य भूमिकेत होते. 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळवलं आहे. आता सध्या हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये ओटीटीवर उपलब्ध आहे.
14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला, सूक्ष्मदर्शिनी हा 2024 चा भारतीय मल्याळम भाषेतील ब्लॅक कॉमेडी मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन एम. सी. जितिन यानं केलेलं आहे. लिबिन टी.बी. आणि अतुल रामचंद्रन यांनी लिहिलेल्या या चित्रपटानं भारतात आतापर्यंत एकूण 27.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटानं जगभरात एकूण 54.36 कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामध्ये 22.25 कोटी रुपयांच्या परदेशातील कमाईचाही समावेश आहे.
चित्रपटाबाबत थोडंस...
चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलायचं झालं तर, सूक्ष्मदर्शिनी... प्रियदर्शिनी उर्फ प्रिया या व्यक्तिरेखाच्या अवती-भोवती फिरते, जी पती अँटनी आणि त्यांची तरुण मुलगी कानीसोबत आनंदी जीवन जगत असते. प्रियाची शेजार-पाजारच्या महिलांसोबत चांगली गट्टी जमते. त्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुपही आहे. पण, द्यावेळी ग्रेस बेकर्सचा मालक मॅन्युएल त्याची वृद्ध आई ग्रेससोबत तिच्या गृहनिर्माण कॉलनीत राहायला येतो, त्यावेळी मॅन्युएल प्रियासह साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतो. काही दिवस चांगले जातात. पण, त्यानंतर मात्र प्रियाला त्याच्यावर संशय येतो आणि ती त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेते. त्यानंतर पुढे जे घडतं, ते हादरवून सोडणार आहे. आणि या चित्रपटाचा क्लायमॅक्स तर अगदी भंडावून सोडतो.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

