Amitabh Bachchan 1600 crore Property Heir: अमिताभ बच्चन यांच्या 1600 कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
Amitabh Bachchan 1600 crore Property Heir: अमिताभ बच्चन यांच्या पश्चात, 1600 कोटींची प्रॉपर्टी कुणाला मिळणार? वारसदाराचं नाव ऐकून तुम्हीही व्हाल हैराण... एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल.

Amitabh Bachchan 1600 crore Property Heir: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी अशी काही पोस्ट केली आहे की, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, "जाने का समय...". ही पोस्ट पाहून चाहते पुरते हादरले आहेत. त्यासोबतच बिग बींच्या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांना नेमकं म्हणायचंय काय? यांसारखे अनेक प्रश्न पडले आहेत. अशातच आता बिग बींच्या ट्वीटसोबतच त्यांचा एक जुना इंटरव्यू व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांचं ट्वीट पाहून चाहते कन्फ्युज
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे चाहते पुरते चिंतेत पडले आहेत. ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले असून त्यांना बिग बींची काळजी लागून राहिली आहे. पोस्ट वाचून अमिताभ बच्चन यांना असं वाटतंय की, आता ते कामातून रिटायरमेंट घेऊ शकतात. अशातच आता आणखी काही चर्चा सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरतोय बिग बींच्या एका जुन्या इंटरव्यूचा व्हायरल होणारा व्हिडीओ. अमिताभ बच्चन यांच्या प्रॉपर्टीबाबतचा एक जुना इंटरव्यू सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या इंटरव्यूमध्ये अमिताभ बच्चन आपल्या प्रॉपर्टीच्या वारसदाराबाबत सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
जया अन् मी आधीच ठरवलंय...
Reddit फार वर्षांपूर्वी दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, "ज्यावेळी मी या जगाचा निरोप घेईन, त्यावेळी जे काही माझ्याकडे आहे, त्याचं माझी मुलगी आणि माझा मुलगा यांच्यात समसमान वाटप केलं जाईल. याबाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. जया आणि मी हे फार पूर्वीच ठरवून ठेवलं होतं."
जुन्या मुलाखतीत बोलताना, अमिताभ बच्चन यांनी त्यांची मालमत्ता त्यांची दोन्ही मुले अभिषेक आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यात समान वाटण्याचा निर्णय जाहीर केला. याचा अर्थ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनाही त्यांच्या वारशावर समान हक्क असतील. 2024 पर्यंत, अमिताभची एकूण संपत्ती 1,600 कोटी इतकी होती.
अमिताभ बच्चन दोन मुलांमध्ये कोणताही भेदभाव करत नाहीत
अमिताभ बच्चन पुढे बोलताना म्हणाले की, ते मुलींना दुसऱ्यांच्या घरचं देणं मानत नाहीत. सगळे म्हणतात की, मुलगी ही दुसऱ्याची लक्ष्मी असते, ती माहेर सोडून तिच्या नवऱ्याच्या घरी जाईल, पण माझ्या दृष्टीनं ती आमची मुलगी आहे. अभिषेकइतकाच तिचाही सर्व गोष्टींवर अधिकार आहे. असं म्हटलं जातं की, अमिताभ बच्चन यांनी त्यांचा बंगला जलसा त्यांची मुलगी श्वेताच्या नावावर केला आहे. ज्या वेळी त्यांनी श्वेताला बंगला गिफ्ट दिला तेव्हा बंगल्याची किंमत तब्बल 50 कोटी रुपये होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























