एक्स्प्लोर

Sonu Sood : आसाममधील पूरग्रस्तांना सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाला, 'आसामला आपली गरज'

आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा आसाममधील पूरग्रस्तांना मदत करणार आहे. 

Sonu Sood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं सध्या आसमामधील (Assam Flood) काही भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. आसाममधील 32 जिल्हे आणि 22 लाखांपेक्षा जास्त लोक सध्या महापुराचा सामना करत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त असलेल्या सिल्चर भागाची पाहणी केली होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. रोहित शेट्टी आणि अर्जुन कपूर यांनी आसाममधील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देखील मदत करणार आहे. 

अभिनेता सोनू सूदनं ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'आसामला आपली गरज आहे. आता नाही तर कधी?' या ट्वीटमध्ये सोनूनं  AssamFloodsया हॅशटॅगचा वापर केला आहे. सोनूनं शेअर केलेल्या या ट्वीटला  एका युझरनं कमेंट केली,'प्लीज आम्हाला मदत करा सर, आसाममधील गरिब लोक खूप अस्वस्थ आहेत. त्यांच्याकडे खायला अन्न-धान्य देखील नाहीये. ' तसेच सोनूनं एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओला सोनूनं कॅप्शन दिलं, 'आसाम, माझी टीम तुमची मदत करण्यासाठी येत आहे' या व्हिडीओमध्ये सोनीनं एक हेल्प लाईन नंबर देखील शेअर केला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या माहितीनुसार, यावर्षी राज्यात पूर आणि भूस्खलनात जीव गमावलेल्या लोकांची संख्या 126 वर पोहोचली आहे. रविवारी बारपेटा, कचार, दररंग, करीमगंज आणि मोरीगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार मुलांसह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. आसाममधील 32 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा, कछार, दरांग, करीमगंज आणि मोरीगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून दोन जण बेपत्ता आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी कचारमधील सिल्चर आणि कामरूपमधील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
Nana Patekar Passes Away: 'माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट, माझा मित्र गेला...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं अशोक सराफ भावूक, मित्राच्या आठवणींत मामा भरभरुन बोलले...
'माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट, माझा मित्र गेला...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं अशोक सराफ भावूक, मित्राच्या आठवणींत मामा भरभरुन बोलले...
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death: नाना पाटेकर अभिनयाकडे कसे वळले?; 35 रुपये कमाई, एक वेळेचं जेवण...डोळे पाणावणारा संघर्ष, कारगिल युद्धातही बजावली सेवा
नाना पाटेकर अभिनयाकडे कसे वळले?; 35 रुपये कमाई, एक वेळेचं जेवण...डोळे पाणावणारा संघर्ष, कारगिल युद्धातही बजावली सेवा

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget