(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending Video : लग्नात दिवंगत वडिलांचा मेणाचा पुतळा पाहून नवरीला अश्रू अनावर, लाडक्या बहिणीसाठी भावाची अनोखी भेट
Trending Video : लाडक्या बहिणीला लग्नामध्ये दिवंगत वडिलांची कमी भासू नये म्हणून भावानं वडिलांसारखा हूबेहूब पुतळा बहिणीला भेट दिला. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Viral Video : तामिळनाडूमधील अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याला अनोखा म्हण्याचं कारण म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावानं दिलेली ह्रद्यस्पर्शी भेट पाहून सगळेच अवाक झाले आहेत. भावाने बहिणीच्या लग्नाच्या दिवशी दिवंगत वडिलांचा हूबेहूब पुतळा बहिणीला भेट दिला. दिवंगत वडिलाच्या पुतळ्या समोर नवरीचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नवरी अश्रू अनावर झाले. शिवाय हा क्षण अनुभवणारा प्रत्येकजण भावूक झाला होता.
प्रत्येकाच्या जीवनात आईवडिलांचं मोलाचं स्थान असतं. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील थिरुकोविलूर भागात असलेल्या थानाकानंदल गावात अनोखी घटना घडली आहे. या गावात राहणारे सुब्रह्मण्यम अवुला यांचं वयाच्या 56 व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या मार्च महिन्यात निधन झालं. अलीकडेच सेल्वराज यांची मुलगी माहेश्वरी हिचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं.
या लग्नाची तयारी सेल्वराज हयात असताना सुरु होती. मात्र लग्नावेळी वडील आपल्यासोबत नसणार यामुळे माहेश्वरी खूपच दु:खी होती. यामुळे माहेश्वरीचा भाऊ फाणी अवुला भावाने आणि आई पद्मावती यांनी कुटुंबियांसोबत मिळून तिला लग्नाच्या दिवशी मोठी भेट देण्याचं ठरवलं. त्यांनी माहेश्वरीच्या वडिलांचा मेणाचा पुतळा बनवण्याचं ठरवलं.
View this post on Instagram
पाच लाख रुपयांत बनला पुतळा
हा पुतळा कर्नाटक येथे तयार करण्यात आला असून यासाठी एक वर्षाला कालावधी लागला. या पुतळ्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये होती. लग्नाच्या दिवशी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न मंडपाजवळ हा पुतळा ठेवण्यात आला. यानंतर, जेव्हा माहेश्वरी लग्न मंडपात आली तेव्हा तिच्या वडिलांचा मेणाचा पुतळा पाहून तिला धक्काच बसला नाही तर बराच वेळ टक लावून बसली. यानंतर तिला अश्रू अनावर झाले होते. ती पुतळ्याच्या पायाजवळ बसून बराच वेळ रडत होती. हे संपूर्ण दृश्य खूपच भावूक करणार होतं. कुटुंबियांचे हे प्रेम पाहून तेथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.