सोनाली बेंद्रेचे सलमान खानच्या स्वभावाबाबत मोठे खुलासे; 'हम साथ साथ हैं'च्या शूटींगवेळीचे किस्से सांगितले VIDEO
Sonali Bendre talk about Salman Khan : सोनाली बेंद्रेचे सलमान खानच्या स्वभावाबाबत मोठे खुलासे; Hum Saath - Saath Hain च्या शूटींगवेळीचे किस्से सांगितले

Sonali Bendre talk about Salman Khan : अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या करिअरविषयी सविस्तरपणे संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी सलमान खानसोबतचा (Salman Khan) अभिनय करतानाचा अनुभव, त्याचा स्वभाव आणि सलमानशी असलेल्या मैत्रीबाबत सविस्तरपणे भाष्य केलं. सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगाशी संघर्ष करत असताना सलमान खानने (Salman Khan) कशाप्रकारे साथ दिली? याबाबतही तिने सविस्तर भाष्य केलं. (Sonali Bendre talk about Salman Khan)
सुरुवातीला सलमान फारसा आवडत नसे
एएनआयच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने तिच्या आयुष्यातील चढ-उतारांवर आणि करिअरवर मोकळेपणाने भाष्य केलं. सोनाली म्हणाली, “सुरुवातीला मला सलमान आवडायचा नाही. आमच्यात फारशी मैत्री नव्हती. यामागे एक कारणही आहे.”
‘हम साथ साथ हैं’च्या सेटवर त्रास द्यायचा
सोनाली पुढे म्हणाल्या, “जेव्हा मी ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानसोबत काम करत होते, तेव्हा तो सतत त्रास द्यायचा. मी शॉट देत असताना, तो कॅमेऱ्याच्या मागून विचित्र चेहऱ्यांचे हावभाव करून माझं लक्ष विचलित करायचा. मला वाटायचं, हा किती विचित्र मुलगा आहे! त्यामुळे तो मला विशेष आवडायचा नाही.” (Sonali Bendre talk about Salman Khan)
वेळेनुसार समजला सलमानचा स्वभाव
पुढे त्या म्हणाल्या, “सलमानच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता किंवा त्याचा तिटकारा करू शकता. मी वेळेनुसार त्याला ओळखू लागले. तो एखाद्या खोडकर मुलासारखा आहे, पण त्याचवेळी तो खूप काळजीही घेतो. मला आठवतं, जेव्हा मला कॅन्सर झाला आणि माझ्यावर उपचार सुरू होतं, तेव्हा त्याने माझ्या पती गोल्डीला कॉल करून सर्वोत्तम डॉक्टर सुचवले. त्याला वाटायचं की माझ्या उपचारांमध्ये काहीच त्रुटी राहू नये. ही सलमानची एक अतिशय हळवी बाजू आहे.” (Sonali Bendre talk about Salman Khan)
सोनाली बेंद्रेचा करिअर अपडेट
कॅन्सरमधून मुक्त झाल्यानंतर सोनालीने पुन्हा अभिनयात पुनरागमन केलं. 2022 मध्ये ती ‘ब्रोकन न्यूज’ या वेबसीरिजमध्ये झळकली. तिने पुढेही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये व वेबसीरिजमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच तिने अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅप्पी’ चित्रपटात एक कॅमिओ साकारला होता. (Sonali Bendre talk about Salman Khan)
इतर महत्त्वाच्या बातम्या
ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी, स्टार प्रवाहवर येणार नवी मालिका; प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली























