एक्स्प्लोर

Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत

Iran War Live Update: इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांचा 28 फेब्रुवारी रोजी, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात मृत्यू होऊनही धार्मिक नेतृत्व व्यवस्था एकजूट राहिली आहे.

Iran War Live Update: अमेरिका आणि इस्रायलने दोन आठवड्यांपासून इराणवर हवाई हल्ले केले असले तरी, इराणची राजवट मजबूत आहे आणि ती कोसळण्याचा धोका नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालात हे उघड झाले आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या तीन सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीमध्ये ही अपडेट समोर आली आहे. एका सूत्रानुसार, अनेक गुप्तचर अहवालांमध्ये असे मान्य करण्यात आले आहे की इराणचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत नाही आमि देशावर त्यांचे नियंत्रण आहे. दरम्यान, तेलाच्या वाढत्या किमतींमुळे राजकीय दबाव वाढत आहे. या संदर्भात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की अमेरिका लवकरच युद्ध संपवू शकते. तथापि, जर इराणचे कट्टरपंथी नेते सत्तेत राहिले तर युद्ध संपवण्याचा मार्ग शोधणे कठीण होईल.

इराणचे सध्याचे सरकार पडेल की नाही हे अनिश्चित  

गुप्तचर अहवालांनुसार, इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी यांचा 28 फेब्रुवारी रोजी, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात मृत्यू होऊनही धार्मिक नेतृत्व व्यवस्था एकजूट राहिली आहे. एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने रॉयटर्सला असेही सांगितले की गुप्त बैठकींमधून असेही दिसून आले आहे की सध्याचे इराणी सरकार पडण्याची शक्यता नाही. सूत्रांनी असेही म्हटले आहे की जमिनीवरील परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि भविष्यात इराणमधील परिस्थिती वेगळी दिशा घेऊ शकते.

खामेनी यांच्या मृत्युनंतरही इराणवर नेतृत्वाचे नियंत्रण

युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि इस्रायलने अनेक इराणी ठिकाणांना टार्गेट केले आहे. यामध्ये हवाई संरक्षण प्रणाली, अणु प्रतिष्ठाने आणि सर्वोच्च नेतृत्वाशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने या युद्धाची वेगवेगळी कारणे दिली आहेत. युद्धाच्या वेळी ट्रम्प यांनी इराणी लोकांना त्यांचे स्वतःचे सरकार बदलण्याचे आवाहन केले होते. तथापि, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की इराणी सरकार उलथवून टाकणे हे या कारवाईचे उद्दिष्ट नव्हते. खामेनी व्यतिरिक्त, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ कमांडर देखील हल्ल्यात मारले गेले. इराणमधील ही एक शक्तिशाली निमलष्करी दल आहे, जी देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग नियंत्रित करते.

असे असूनही, अमेरिकन गुप्तचर अहवालांनुसार, खामेनी आणि आयआरजीसी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर तयार झालेली अंतर्गत नेतृत्व व्यवस्था अजूनही देशावर नियंत्रण राखते. ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशनच्या तज्ज्ञ सुझान मॅलोनी यांनी सांगितले की, सध्या इराणमध्ये अशी कोणतीही शक्ती नाही जी सरकारच्या उर्वरित सत्तेला आव्हान देऊ शकेल. त्यांच्या मते, इराण कदाचित त्याच्या शेजाऱ्यांविरुद्ध पूर्ण शक्ती वापरू शकणार नाही, परंतु तरीही तो देशात पूर्ण नियंत्रण राखण्यास सक्षम आहे.

अमेरिकन सैन्य इराणमध्ये युद्धात जाणार?

या आठवड्यात, इराणमधील वरिष्ठ शिया धर्मगुरूंच्या संघटनेच्या असेंब्लीने खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना नवे सर्वोच्च नेते घोषित केले. दुसऱ्या एका सूत्रानुसार, इस्रायलचा हेतू सध्याच्या इराणी राजवटीचा कोणताही भाग सत्तेत राहू नये याची खात्री करणे आहे. तथापि, सध्याची अमेरिका आणि इस्रायली कारवाई सरकार कसे पाडू शकेल हे अद्याप स्पष्ट नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की यासाठी जमिनीवर लष्करी कारवाईची आवश्यकता असेल, ज्यामुळे इराणमध्ये निदर्शने होऊ शकतात. ट्रम्प प्रशासनाने अद्याप इराणमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची शक्यता नाकारलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Embed widget