ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी, स्टार प्रवाहवर येणार नवी मालिका; प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली
Halad Rusli Kunku Hasla new marathi serial : ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी, स्टार प्रवाहवर येणार नवी मालिका; प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली

Halad Rusli Kunku Hasla new marathi serial : स्टार प्रवाह नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पाहायला मिळतात. आता या वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे – "हळद रुसली, कुंकू हसलं" (Halad Rusli Kunku Hasla). या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. (Halad Rusli Kunku Hasla)
View this post on Instagram
प्रोमोमध्ये ग्रामीण आणि शहरी संस्कृतीतील अभिनेता आणि अभिनेत्री समोरा समोर येताना दिसणार आहेत. प्रोमोमध्ये दिसतंय की, अभिनेत्री समृद्धी केळकर हिने एका ठाम आणि स्वाभिमानी ग्रामीण मुलीची भूमिका साकारली आहे. तिची गाय जखमी झाल्यामुळे ती बुलेटला जोडलेली बैलगाडी घेऊन डॉक्टरकडे निघते. दुसरीकडे, अभिषेक रहाळकर ह्यांनी शहरी तरुणाची भूमिका केली आहे, जो गावात कोणाला तरी भेटायला कारने येतो. या दोघांची गाठ एका अरुंद पुलावर पडते, जिथून एकाच वेळी फक्त एक वाहन जाऊ शकतं. यामुळे त्यांच्यात वाद होतो, पण शेवटी नायिका आपला आत्मविश्वास दाखवत त्याला गाडी मागे घ्यायला लावते.
हा प्रोमो शेअर करत असताना स्टार प्रवाहने "ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी... येत आहेत भेटायला... नवी मालिका 'हळद रुसली, कुंकू हसलं' लवकरच Star प्रवाहवर..." असं कॅप्शन दिलं आहे.
फुलाला सुगंध मातीचा’ या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली समृद्धी केळकर आता नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2022 मध्ये तिच्या आधीच्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला, पण त्यानंतरही तिच्या लोकप्रियतेत किंचितही घट झाली नाही. तब्बल दोन-अडीच वर्षांच्या विश्रांतीनंतर ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने तिचे चाहते विशेष आनंदित आहेत.
समृद्धीचा हा कमबॅक ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या नव्या मालिकेद्वारे होतो आहे. या मालिकेत ती एका गावरान, ठाम आणि आत्मविश्वासू तरुणीची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अभिनेता अभिषेक रहाळकर, ज्याने यापूर्वी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत काम केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पार्टनर सिनेमातील बाल कलाकार आता झालाय 25 वर्षांचा; 15 वर्षांनंतर कसा दिसतो? पाहा फोटो




















