एक्स्प्लोर

Gaurav Khanna: ना 50 लाख, ना कार... 'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्नाला काहीच मिळालं नाही, म्हणाला...

आतापर्यंत केलेल्या इतर कोणत्याही शोपेक्षा ‘बिग बॉस 19’मुळे त्याला सर्वाधिक ओळख मिळाली आहे.

Gaurav Khanna: टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) याला छोट्या पडद्यावरील ‘हँडसम हंक’ म्हणून ओळखलं जातं. बिग बॉस 19 (Bigg Boss 19) जिंकल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली आणि तो घराघरात ओळखला जाऊ लागला. मात्र शो जिंकल्यानंतर मिळणारी 50 लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचा खुलासा गौरवने अलीकडील यूट्यूब व्लॉगमध्ये केला आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ घरात राहिल्यानंतर गौरव खन्ना ‘बिग बॉस 19’चा विजेता ठरला. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये होस्ट सलमान खानने गौरवला विजेता घोषित केले. मात्र शो जिंकल्यानंतर मिळणारी 50 लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम अजूनही मिळालेली नसल्याचं त्याने सांगितलं.

गौरवला अजून मिळाले नाहीत बक्षिसाचे पैसे

गौरव आपल्या नव्या व्लॉगमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. त्यावेळी एका चाहत्याने विचारलं की, शोमध्ये जिंकलेल्या रोख रकमेबरोबरच कार आणि कूपन मिळाले का? यावर गौरव म्हणाला, “खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी यायला थोडा वेळ लागतो. अजूनपर्यंत काहीही मिळालेलं नाही. पण मिळेल याची मला खात्री आहे. कारण यासाठी एक प्रक्रिया असते.” तो पुढे म्हणाला, “साधारणपणे एक-दोन महिने लागतात. कंपन्यांची स्वतःची इंटरनल ऑडिट प्रक्रिया असते. त्यामुळे थोडा उशीर होतो, पण काही अडचण नाही. मी टीव्ही इंडस्ट्रीतला माणूस आहे, इथे थोडा डिले होणं सामान्य आहे.”

कानपूरच्या घरी चाहत्यांची गर्दी

शो जिंकल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला, असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला. यावर गौरवने सांगितलं की कानपूरमधील त्याच्या घरी रोज सुमारे 50 ते 60 लोक भेटायला येतात. प्रेक्षकांना त्याचा शांत आणि सन्मानाने खेळलेला गेम खूप आवडला, असंही त्याने सांगितलं. त्याच्या मते, आतापर्यंत केलेल्या इतर कोणत्याही शोपेक्षा ‘बिग बॉस 19’मुळे त्याला सर्वाधिक ओळख मिळाली आहे.

गौरवचा दुसरा रिअॅलिटी शो विजय

गौरव खन्नाने याआधी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ जिंकल्यानंतर ‘बिग बॉस 19’ची ट्रॉफीही आपल्या नावावर केली. या शोमध्ये त्याने फरहाना भट , तान्या  मित्तल , प्रणीत मोरे आणि अमाल मलिक यांना मागे टाकत विजेतेपद मिळवलं. विशेष म्हणजे, अनावश्यक भांडणं किंवा वाद न घालत शांतपणे खेळ खेळून शो जिंकणाऱ्या मोजक्या स्पर्धकांमध्ये गौरवचा समावेश झाला.

हेही वाचा:

Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget