एक्स्प्लोर

Son of Sardaar 2 चा ट्रेलर आऊट, दिग्गज कलाकारांची एन्ट्री, धुळ्याची अभिनेत्री मुख्य भूमिकेत VIDEO

Son of Sardaar 2 Trailer : विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रवी किशन, संजय मिश्रा, नीरू बाजवा, चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Son of Sardaar 2 Trailer :  अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा भन्नाट कॉमेडी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  यावेळी तो "सन ऑफ सरदार" च्या सिक्विलमध्ये दुसऱ्या भागात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झाला असून धुळ्याची अभिनेत्री मृणाल ठाकूर प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरवरून स्पष्ट होते की हा चित्रपट प्रेक्षकांना भरभरुन मनोरंजन करणार आहे. 

सन ऑफ सरदार 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात सन ऑफ सरदार 2 चा ट्रेलर लाँच करण्यात आला. पहिला भाग पंजाबमध्ये घडतो, तर दुसरा भाग स्कॉटलंडमध्ये सेट करण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवातच या प्रश्नाने होते – “तो स्कॉटलंडमध्ये टिकेल का?” ट्रेलरची सुरुवात एका विनोदी प्रसंगाने होते. अजयचं पात्र एका वृद्ध महिलेला ‘बेबे’ म्हणत पाहतो आणि ती पोल डान्स करत असताना कोसळते. हे दृश्य पाहूनच हे विनोदी चुका आणि गोंधळांनी भरलेलं कथानक असणार, याची जाणीव होते.

पुढील ट्रेलरमध्ये अजय आणि मृणाल ठाकूर यांचं पात्र एका लग्नासाठी धावपळ करत असल्याचं दाखवलं आहे. या दरम्यान इतर अनेक पात्रं त्यांच्या प्रेमकथेतील भाग होतात, आणि यामुळे भरपूर अ‍ॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडी पाहायला मिळते. चित्रपटात एक सैन्य अधिकाऱ्याचं पात्रही आहे. ट्रेलरमध्ये अजय पाकिस्तानवर टीका करताना दिसतो – “ते आपल्या देशावर बॉम्ब टाकतात.” एका प्रसंगात ‘बॉर्डर’ चित्रपटातील सनी देओलचा संदर्भ दिला आहे. याशिवाय, दिवंगत मुकुल देव यांचं अंतिम स्क्रीन अपिअरन्सही या चित्रपटात आहे, त्यांच्यासोबत विंदू दारा सिंग, रवि किशन आणि कुब्रा सैतदेखील झळकणार आहेत.

ट्रेलरमध्ये अनेक लक्षवेधी संवाद आहेत. पहिल्या भागातील “जस्ट जोकिंग” आणि “कदी हस्सss वी लिया करो” असे संवाद पुन्हा वापरले आहेत, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतात. फॅन्सच्या प्रतिक्रिया मात्र संमिश्र आहेत. काहींना सोनाक्षी सिन्हा मिस झाली, तर काहींनी विचारलं की हा सिक्विल काढण्याची गरज काय होती?
“पहिला भाग कधीही याहून चांगला होता,” असं एकाने लिहिलं. दुसऱ्याने म्हटलं, “सर्कस 2.0 लोडिंग... मूळ 'सन ऑफ सरदार'च्या 1% चांगला वाटत नाहीये. 

एकाने तर स्पष्ट म्हटलं, “सोनाक्षी सिन्हाला का बदललं? मृणाल आणि अजय यांच्यात केमिस्ट्री शून्य आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “सोनाक्षी नसल्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण वाटतो.” काहींनी टीका केली – “बॉलिवूडने हे जबरदस्तीचे, खोटं हसवणारे कॉमेडी चित्रपट बनवणं थांबवावं.”  तरी काही प्रेक्षकांनी ट्रेलरचं कौतुकही केलं – “अजय देवगण पुन्हा कॉमेडीत परतला आहे,” “नॉस्टॅल्जियाचा स्फोट” अशा प्रतिक्रिया दिल्या. एकाने तर लिहिलं, “जस्सी पुन्हा आलाय जोरदार डायलॉग्ससह!”

सन ऑफ सरदार 2 विषयी थोडक्यात माहिती:

या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केलं आहे. रवि किशन, संजय मिश्रा, नीरू बाजवा, चुंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोब्रियाल, विंदू दारा सिंग, रोशनी वालिया, शरत सक्सेना, साहिल मेहता आणि दिवंगत मुकुल देव या कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी केली असून Jio Studios आणि Devgn Films यांच्या प्रस्तुतीत हा चित्रपट 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सन ऑफ सरदार (2012) या पहिल्या भागापासून पुढे सुरू न होता, एक वेगळी आणि नवी कथा मांडणार असल्याचं मानलं जातं. 2012 मध्ये आलेल्या पहिल्या भागात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत होती. त्या चित्रपटात संजय दत्त यांची विशेष भूमिका होती. या चित्रपटाचं 'जब तक है जान' सोबत मोठं क्लॅश झालं होतं, पण तरीही बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली कामगिरी केली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'किती रुपयांमध्ये विकले गेलात, लाजीरवाणे..', पवन कल्याण यांनी हिंदीचं महत्त्व सांगताच प्रकाश राज यांची टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget