एक्स्प्लोर
Pooja Bedi Birthday | 90 च्या दशकात एका जाहिरातीने अभिनेत्री पूजा बेदी आली चर्चेत, सलमानवर केले होते आरोप
पूजा बेदीने बिग बॉसमध्ये सलमान खानवर देखील आरोप केले होते. शोमधून काढल्यानंतर तिने ट्विटरवर 'सलमान बिग बॉसमधील स्पर्धकांसोबत चुकीचं वागतो. तसंच बिग बॉसमधील स्पर्धकांचं खच्चीकरण करतो' असं म्हटलं होतं.
Pooja Bedi Birthday: अभिनेत्री आणि बिग बॉस 5 ची स्पर्धक असलेली पूजा बेदी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. पूजा प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांची मुलगी. 1970 मध्ये जन्मलेली पूजा बेदी अनेकदा चर्चेत असते ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं. पूजा बेदी खरी चर्चेत आली ती 90 च्या दशकात तिने केलेल्या एका बोल्ड जाहिरातीमुळं. कामसूत्र कंडोमच्या एका जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. 1991 मध्ये पूजा बेदीने ही जाहिरात केली होती. ज्या जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती.
पूजा बेदी सेक्स लाईफ विषयी खुलेआम बोलण्यासाठी देखील नेहमी चर्चेत असते.
पूजा बेदीने बिग बॉसमध्ये सलमान खानवर देखील आरोप केले होते. शोमधून काढल्यानंतर तिने ट्विटरवर 'सलमान बिग बॉसमधील स्पर्धकांसोबत चुकीचं वागतो. तसंच बिग बॉसमधील स्पर्धकांचं खच्चीकरण करतो' असं म्हटलं होतं.
पूजा ने आमिर खानसोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमात काम केलं होतं. सोबतच 'विषकन्या', 'लुटेरे', 'फिर तेरी कहानी याद आए', 'आतंक ही आतंक' आणि 'शक्ति' अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली. 'जो जीता वही सिकंदर' मध्ये पूजाने आमिर खानसोबत किसिंग सीन केला होता. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली.
पूजा बेदीने 1994 मध्ये साडेतीन वर्ष डेटिंग केल्यानंतर फरहान फरनीचरवाला सोबत लग्न केलं. मात्र 12 वर्षानंतर ती त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर तिचं नाव कोरिओग्राफर हनीफ हिलाल, द्विती विक्रमादित्य आणि आकाशदीप सहगल यांच्याशी जोडलं गेलं.
पूजाची मुलगी अलायाने नुकतंच 'जवानी जानेमन' सिनेमातून पदार्पण केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement