एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली
एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव सिनेसंगीतात अत्यंत अदबीने घेतलं जातं. त्यांनी आपल्या गाण्यांनी भारताला मंत्रमुग्ध केलं. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं आहे.
मुंबई : आपल्या अस्सल आवाजाने भारतीय संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले सुप्रसिद्ध गायक एस.पी. सुब्रमण्यम यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं असून, डॉक्टर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव सिनेसंगीतात अत्यंत अदबीने घेतलं जातं. त्यांनी आपल्या गाण्यांनी भारताला मंत्रमुग्ध केलं. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. 90 च्या दशकामध्ये अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना अभिनयाचीही आवड होती. हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. एलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत 40 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.
एस.बी. बालसुब्रमण्यम यांना 5 ऑगस्टला कोरोनाचं निदान झालं होतं. त्यांना तातडीने चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. अचानक गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी आयसीयूत हालवण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement