Sikandar Box Office Collection Day 12: 'जाट'नं रिलीज होताच 'सिकंदर'चं कंबरडं मोडलं, सलमान खानचं स्टारडम पाण्यात; बॉक्स ऑफिसवर चित्रपट बेहाल!
Sikandar Box Office Collection: सलमान खानचा 'सिकंदर' आता व्हेंटिलेटरवर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा परिस्थितीत, 'सिकंदर' आता बॉक्स ऑफिसवरुन लवकरच आपला गाशा गुंडाळेल, यात काही शंका नाही.

Sikandar Box Office Collection Day 12: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) 30 मार्चला ईदच्या निमित्तानं थिएटरमध्ये रिलीज झाला. पण, या चित्रपटामुळे सलमान खानच्या स्टारडमचा कस लागला. फिल्ममध्ये सलमान खान पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसला खरा, पण प्रेक्षकांना भाईजानचा हा चित्रपट फारसा आवडला नाही आणि तो बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) फ्लॉप ठरला. जरी पहिल्या तीन दिवसांत 'सिकंदर'नं आपली ताकद दाखवली आणि चांगली कमाई केली. पण, त्यानंतर मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. आधीच बॉक्स ऑफिसवर अखेरच्या घटका मोजत असलेल्या 'सिकंदर'ला, सनी देओलच्या (Sunny Deol) 'जाट'शी स्पर्धा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत, 'सिकंदर'नं रिलीजच्या बाराव्या दिवशी किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...
'सिकंदर'नं बाराव्या दिवशी किती कमावले?
एआर मुरुगादॉस दिग्दर्शित 'सिकंदर'कडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर याला क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून फारच निगेटिव्ह रिव्यू मिळाला. यामुळे, 'सिकंदर'ची जादू चालली नाही, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर वाईट स्थितीत पोहोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सलमान खानची स्टार पॉवर देखील 'सिकंदर'ला यशस्वी होण्यास मदत करू शकली नाही. बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी आधीच संघर्ष करत असलेला 'सिकंदर' आता सनी देओलच्या 'जाट'शी स्पर्धा करत आहे. 'जाट' येताच त्यानं 'छावा'चा खेळ संपवला. दरम्यान, जर आपण सलमान खान स्टारर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललो तर...
- 'सिकंदर'ची पहिल्या आठवड्याची कमाई 90.25 कोटी रुपये होती.
- चित्रपटानं सहाव्या दिवशी 3.5 कोटी, सातव्या दिवशी 4 कोटी आणि आठव्या दिवशी 4.75 कोटी रुपये कमावले.
- या चित्रपटानं नवव्या दिवशी 1.75 कोटी, दहाव्या दिवशी 1.5 कोटी आणि अकराव्या दिवशी 1.35 कोटी रुपये कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाराव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या गुरुवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिकंदर'नं रिलीजच्या बाराव्या दिवशी 71 लाखांचा व्यवसाय केला आहे.
- यासह, 12 दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई आता 107.81 कोटी रुपये झाली आहे.
'जाट'नं बिघडवला 'सिकंदर'चा खेळ
सलमान खानचा सिकंदर बॉक्स ऑफिसवर जेमतेम काही कोटी रुपये कमवत होता आणि आता 'जाट'नं येताच सिकंदरचा संपूर्ण खेळ खराब केला आहे. सनी देओलच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सलमान खानच्या चित्रपटाच्या कमाईला मोठा धक्का बसला आहे आणि ती लाखोंवर येऊन ठेपली आहे. तर 'जाट'नं पहिल्या दिवशी 9.50 कोटी रुपये कमावले आहेत. 'जाट'ची क्रेझ पाहता, आठवड्याच्या शेवटी त्याची कमाई वाढण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















