Jaat Box Office Collection Day 1: सनी देओलच्या 'जाट'चा बॉक्स ऑफिसवर कल्ला, पहिल्याच दिवशी एक नाही, दोन रेकॉर्ड मोडले; ओपनिंग डे कलेक्शन किती?
Jaat Box Office Collection Day 1: सनी देओलच्या 'जाट' चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि यासोबतच या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला एक दमदार सुरुवात मिळाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटानं किती कोटींची कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...

Jaat Box Office Collection Day 1: 2023 मध्ये सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं प्रचंड नफा कमावला होता. 'गदर २' च्या दीड वर्षानंतर, सनी देओल 10 एप्रिल रोजी 'जाट' हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि सनी देओलच्या या चित्रपटानं थिएटरमध्ये येताच पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. 'जाट'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली? सविस्त जाणून घेऊयात...
'जाट'नं पहिल्या दिवशी किती कमाई केली?
सनी देओलनं 'जाट' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित हा चित्रपट एक टिपिकल साऊथ अॅक्शन मसाला चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचं खूप कौतुक होत आहे आणि लोक सनी देओल, तसेच रणदीप हुड्डा यांच्या दमदार अभिनयानं प्रभावित झाले आहेत. गंमतीशीर बाब म्हणजे, 'जाट' चित्रपट अजित कुमारच्या 'गुड बॅड अग्ली' आणि पंजाबी चित्रपट 'अकाल' सोबत टक्कर देत आहे, तर सलमान खानच्या 'सिकंदर' सोबतही त्याला स्पर्धा करावी लागली आहे, तरीही सनी देओल 'जाट' म्हणून प्रसिद्ध झाला आहे. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
View this post on Instagram
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जाट'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 9.50 कोटी रुपये कमावले आहेत. जरी हे सुरुवातीचे आकडे असले, तरी अधिकृत आकडे जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात. हा सनी देओलच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला.
'जाट'नं प्रदर्शित होताच अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट सनी देओलच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. सनीचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट 'गदर 2' आहे, ज्यानं पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपये कमावले. आता 'जाट' हा 9.50 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह अभिनेत्याचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट बनला आहे.
'जाट' 2025 मधील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनर
'जाट'नं त्याच्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. हा चित्रपट छावा, सिकंदर आणि स्काय फोर्स नंतर 2025 मधील चौथा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट बनला आहे. बॉलीवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे हे चित्रपट आहेत.
- 'छावा'नं पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपये कमावले होते.
- 'सिकंदर'चा पहिल्या दिवशीचा गल्ला 27.50 कोटी रुपयांचा होता.
- 'स्काय फोर्स'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 15.30 कोटी रुपये होते.
- 'जाट'नं पहिल्या दिवशी 9.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'जाट'मध्ये सनी देओल आणि रणदीप हुड्डा व्यतिरिक्त विनीत कुमार सिंह, रेजिना कॅसांड्रा, जगपती बाबू, सैयामी खेर आणि रम्या कृष्णन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 100 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























