Siddharth jadhav : 'आता होऊ दे धिंगणा!' सिद्धार्थ जाधवला मिळाली नवी कार गिफ्ट, बायकोने केली पूजा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Siddharth jadhav : सिद्धार्थ जाधवला त्याच्या होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमासाठी एक नवी कार गिफ्ट मिळाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या बायकोने पूजा केलेल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Siddharth jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) हा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरत आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही तो बराच चर्चेत असतो. पण सध्या एका खास कारणामुळे सिद्धार्थ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचं अभिनंदन देखील केलंय.
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर त्याला नवी कार गिफ्ट मिळाल्याची गूडन्यूज दिली आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्याच, पण या कारची पूजा त्याच्या बायकोने केली आहे. सिद्धार्थ, त्याच्या दोन्ही मुली आणि पत्नी तृप्ती या व्हिडीओमध्ये दिसतायत.
'...इतिहासातला मी पहिलाच कलाकार'
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, 'न मागताच मिळाले आज खूप काही...मराठी टेलिव्हीजन इतिहासातला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग. कारण खूप वर्षांपूर्वी "इंडियन आयडॉल" च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती. ते बघून खूप आनंद झाला होता. आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं 1 चॅनेल वर "आता होऊ दे धिंगाणा" सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही कार बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे.खुप मस्त वाटतंय. आता होऊ दे धिंगाणा..!'
View this post on Instagram
सिद्धार्थ जाधवबद्दल....
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने अनेक नाटकांत, सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'जागो मोहन प्यारे', 'तुमचा मुलगा करतोय काय', 'लोच्या झाला रे' आणि 'गेला उडत' ही सिद्धार्थची नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'दे धक्का', 'मी शिवाजी राजे बोलतोय' अशा दर्जेदार सिनेमांत सिद्धार्थने काम केलं आहे. 'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स', 'सिम्बा' अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांत सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थने रुपारेल कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिकांमध्ये काम केलं आहे. द्रेवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतोय काय' या नाटकाच्या माध्यमातून सिद्धार्थने नाट्यसृष्टीत पदार्पण केलं. 'आपला सिध्दू' या सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची क्रेझ सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येते.