Fire Breakout At Shiv Thakare Mumbai Residence: बिग बॉस फेम शिव ठाकरेचं मुंबईतील घर आगीत भस्मसात; भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Fire Breakout At Shiv Thakare Mumbai Residence: व्हायरल व्हिडीओमध्ये आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर शिव ठाकरेंच्या घराची भीषण अवस्था पाहून अंगावर शहारेच आले आहेत.

Fire Breakout At Shiv Thakare Mumbai Residence: बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या घराला आग लागल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता शिव ठाकरे याच्या मुंबईतील घराला भीषण आग (Fire Breakout At Shiv Thakare Mumbai Residence) लागलीय. शिव ठाकरेच्या (Actor Shiv Thakare) घराचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी आलेला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर शिव ठाकरेच्या घराची भीषण अवस्था पाहून अंगावर शहारेच आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ठाकरे मुंबईत नव्हता.
आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते पुरते हादरले असून त्यांना शिव ठाकरेबाबत चिंता लागून राहिली आहे. शिव ठाकरेच्या टीमनं अभिनेता सुखरुप असल्याची माहिती दिल्यानंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. शिव ठाकरेच्या टीमनं शेअर केलेल्या माहितीनुसार, अभिनेता आता सुखरुप आहे आणि या दुर्घटनेत त्याला किंवा इतर कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
View this post on Instagram
शिव ठाकरेच्या घराचा एक व्हिडीओ 'व्हायरल भयानी' या इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये अग्निशमन दलाचे जवान शिव ठाकरेच्या घराला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओवरून असं दिसून येतंय की, लागलेल्या भीषण आगीत शिव ठाकरेच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. शिव ठाकरेच्या टीमनं आगीच्या दुर्घटनेप्रकरणी एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी माहिती दिलीय की, "आज सकाळी शिव ठाकरेच्या मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व इमारतीतील घराला भीषण आग लागली. त्यामुळे अभिनेत्याला मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलाय. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, पण, घराचं मोठं नुकसान झालं आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























