Shilpa Shetty : सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर भडकली शिल्पा; म्हणाली, 'भावा...'
नुकताच शिल्पाचा (Shilpa Shetty) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा एका चाहत्यावर भडकलेली दिसत आहे.
Shilpa Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) चाहता वर्ग मोठा. शिल्पा चित्रपटांमधून तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. नुकताच शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा एका चाहत्यावर भडकलेली दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती खन्ना हिच्या मुलीच्या म्हणजेच अन्याकाच्या वाढदिवसाला शिल्पा आणि तिच्या मुलीनं हजेरी लावली. बर्थडे पार्टी झाल्यानंतर शिल्पा आणि तिची मुलगी घरी परत जात असतानाच एक चाहता शिल्पाच्या गाडी जवळ जाऊन तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. या चाहत्यावर शिल्पा भडकली. ती म्हणाली, 'काय करतोयस भावा' त्यानंतर तिथे असणारा सिक्यूरिटी गार्ड आला आणि त्यानं तेथील लोकांना गाडीपासून लांब थांबायला सांगितलं.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये शिल्पा मल्टी कलर प्रिंटेड को-ऑर्ड सेट आणि व्हाईट शर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे. तर शिल्पाची मुलगी समिशा ही व्हाईट फ्रॉकमध्ये दिसत आहे. दोघींच्या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली. शिल्पाचा लवकरच निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शिल्पासोबतच अभिमन्यु दसानी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :