Shashank Ketkar Slammed Producer For Unpaid Payment: '...तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडिओ करेन'; शशांक केतकर चिडला, थेट पोस्ट करुन इशाराच दिला, काय घडलं नेमकं?
Shashank Ketkar Slammed Producer For Unpaid Payment: शशांकनं पोस्ट करुन त्या निर्मात्याला इशाराही दिला आहे. पण, या पोस्टमध्ये शशांकनं कोणाचंही नाव घेतलेलं नाही.

Shashank Ketkar Slammed Producer For Unpaid Payment: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असतो. शशांक केतकर नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. पण, आता शशांकनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यानं त्याच्यासोबत झालेल्या गैरकृत्याला वाचा फोडलीय. एका मालिकेच्या निर्मात्याकडून शशांकचं मानधन थकवण्यात आलं आहे. शशांकनं पोस्ट करुन त्या निर्मात्याला इशाराही दिला आहे. पण, या पोस्टमध्ये शशांकनं कोणाचंही नाव घेतलेलं नाही.
मराठी अभिनेता शशांक केतकर म्हणाला की, "5 वर्ष होऊन गेली, मागची 5 वर्ष आणि 8 ऑक्टोबर 2025 पासून पुन्हा संपर्क निर्माण झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही. थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता कंटाळा आला आहे... अजून एक म्हणजेच उद्याची 5 जानेवारी 2026 ही तारीख त्याने दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झाले नाही तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडिओ करेन आणि पेमेंट झाले तर तसाही ते झाल्याचा एक व्हिडिओ पण पोस्ट करेन..."

शंशाक केतकरनं केलेल्या पोस्टवरुन त्याचा संताप दिसून येतोय. तसेच, त्याची ही पोस्ट नेमकी कुणासाठी आहे? याची कुजबूज त्याच्या चाहत्यांसह मराठी टेलिव्हिजन विश्वातही पाहायला मिळतेय. शशांकनं कुणाचंही नाव घेतलं नसलं तरीसुद्धा नेटकरी मात्र अनेक अंदाज बांधत आहेत. अशातच शशांक आज यासंदर्भात सविस्तर व्हिडीओ पोस्ट करतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शशांक केतकरचा रोख मंदार देवस्थळींकडे?
मराठी अभिनेता शशांक केतकरनं पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, ना त्यानं कोणत्याही मालिकेचा उल्लेख केला आहे. मात्र, शशांक केतकरचा रोख मंदार देवस्थळींकडे असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी कारणंही आहे. निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी 'सुखांच्या सरींनी... हे मन बावरे' (2018-2020) ही मालिका केलेली. या मालिकेनंतर मंदार देवस्थळींनी कलाकारांचं मानधन थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला. या मालिकेत शशांक केतकर, मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. या मालिकेतील अनेक कलाकारांनी या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर पोस्ट करत निर्मात्यावर टीका केली होती. शशांकच्या लेटेस्ट पोस्टचा रोखदेखील याच निर्मात्याकडे असावा असा अंदाज लावला जात आहे.























