Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी शेअर केली पोस्ट; म्हणाले, 'राजसाहेबांचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं...'
शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी ट्वीट शेअर करून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेतील भाषणाचे कौतुक केलं आहे.
![Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी शेअर केली पोस्ट; म्हणाले, 'राजसाहेबांचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं...' Sharad ponkshe share tweet on raj thackeray thane speech Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांनी शेअर केली पोस्ट; म्हणाले, 'राजसाहेबांचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/5c499e458098f16aff3779d82dd223bb_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Ponkshe : अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील त्यांची मतं ते सोशल मीडियावर मांडतात. काल (12 एप्रिल) ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड येथे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला मोठ्या संख्येत लोक उपस्थित होते. सभेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केला. याबाबत शरद पोंक्षे यांनी ट्वीट शेअर करून राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणाचे कौतुक केलं आहे.
शरद पोंक्षे यांचे ट्वीट
'आजचं राज यांचे भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राज ठाकरे ', असं ट्वीट शेअर करून शरद पोंक्षे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.
आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं.बऱ्याच काळान धारदार भाषण .हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण.धन्यवाद राजसाहेब.🙏#मनसे #RajThackeray #मनसे_वर्धापनदिन #ameykhopkar
— SHARAD PONKSHE (@ponkshes) April 12, 2022
शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहवरील ठिंपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच त्यांनी उंच माझा झोका, असे हे कन्यादान, राधा ही बावरी अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
- Sonu Nigam On The Kashmir Files : 'म्हणून मी अजूनही द कश्मीर फाइल्स नाही पाहिला...'; सोनू निगमनं सांगितलं कारण
- katrina kaif, Vicky Kaushal : कतरिनाचा एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'प्रेग्नंट आहेस का?'
- kgf chapter 2 : केजीएफ-2 च्या दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट; म्हणाला, 'गोष्टी लिहिताना मी दारू पितो'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)