एक्स्प्लोर

Shantaram Nandgaonkar : 'आश्विनी ये ना' ते ‘रुपेरी वाळूत'; एव्हरग्रीन गाण्यांचे गीतकार शांताराम नांदगावकरांचा स्मृतीदिन, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

शांताराम नांदगावकर (Shantaram Nandgaonkar ) यांचा आज 12 वा स्मृतीदिन आहे. जाणून घ्या त्यांच्या पहिल्या कवितेचा किस्सा आणि त्यांची हिट गाणी

Shantaram Nandgaonkar : प्रसिद्ध कवी आणि गीतकार शांताराम नांदगावकर (Shantaram Nandgaonkar) यांचा आज 12 वा स्मृतीदिन आहे. आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी शांताराम यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. शांताराम यांनी मराठी चित्रपटांसाठी देखील गाणी लिहिली. शांताराम यांचा जन्म कोकणातील कणकवली येथील नांदगाव येथे झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमधील परळ येथे रहायला आले. त्यांचे शिक्षण मुंबईमधील परळ येथील  शिरोडकर हायस्कुलमध्ये झाले. 

हिट चित्रपटांमधील गीतांचे लेखन
शांताराम नांदगावकर यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गीतांचे लेखन केलं आहे. अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, अष्टविनायक आणि पैजेचा विडा या मराठी चित्रपटांमधील गाण्यांचे लेखन शांताराम नांदगावकर यांनी केले आहे. 

पहिल्या कवितेचा किस्सा 
एका मुलाखतीमध्ये शांताराम नांदगावकर यांनी त्यांच्या पहिल्या कवितेचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, 'मी पहिली कविता इयत्ता दहावीत असताना केली. मी देवा समोर दिवा लावून आभ्याला सुरुवात करायचो. मला दिव्याच्या ज्योतीबाबत आकर्षण वाटत होतं. त्यावेळी मला वाटायचे की शायर किंवा कवी हे दिव्यामधील ज्योतीबद्दल चुकीचे लिहितात. 'शमा जले परवाने आये', असं तेव्हाचे शायर म्हणत होते, ते मला आवडतं नव्हते. एकदा मी शाळेतील मुलांसोबत सिनेमा बघायला गेलो. मराठी सिनेमा शाहीराच्या जीवनावर होता. त्यामध्ये देखील त्या शाहीरानं ज्योतीबाबत केलेलं वर्णन मला आवडलं नाही. तेव्हा माझे मित्र मला म्हणाले, शांताराम तू या कल्पनेवर चांगली कविता लिही. शाळेचा आभ्यास करताना मला दिव्याच्या ज्योतीवर कविता सुचली. 'का उगा पतंगा जळसी?' ही कविता मी तेव्हा लिहिली. ही माझी पहिली कविता.'

राजकारणत देखील सक्रिय
1985 मध्ये शांताराम यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक लढली होती. या निवडणूकीमध्ये त्यांना यश मिळाले होते. 

प्रसिद्ध गीते
अशी नजर घातकी बाई, अशीच साथ राहू दे, अश्विनी ये ना, अष्टविनायका तुझा महिमा कसा, रुपेरी वाळूत असाच यावा पहाटवारा, इवले इवले जीवही येती, गा गीत तू सतारी ही शांताराम यांची गाजलेली गीते आहेत. अल्झायमरमुळे 11 जुलै 2009 रोजी शांताराम यांचे निधन झाले.  

हेही वाचा:

Shantaram Nandgaonkar : कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget