एक्स्प्लोर

Sarkha Kahitari Hotay : ‘सारखं काहीतरी होतंय!’, 36 वर्षांनी एकत्र दिसणार प्रशांत दामले-वर्षा उसगांवकरांची जोडी

Sarkha Kahitari Hotay : अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांची तब्बल 36 वर्षांनी एकत्र आलेली सुपरहिट जोडी या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत पहायला मिळणार आहे.

Sarkha Kahitari Hotay : आपलं आयुष्य म्हणजे सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट.. त्यात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली व प्रत्येक पदार्थाला आपली वेगळी चव असते. तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. अशा बदलांना कधी प्रेमानं, कधी रागानं, कधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. नात्यातल्या याच गोडव्याची आणि थोडया तिखटपणाची मजेशीर नोकझोक घेऊन गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'सारखं काहीतरी होतंय'! (Sarkha Kahitari Hotay) हे धमाल विनोदी नाटक येत्या 25 मार्चला रंगभूमीवर दाखल होतंय.

अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांची तब्बल 36 वर्षांनी एकत्र आलेली सुपरहिट जोडी या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत पहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संकर्षण कर्‍हाडे याने केलं आहे.

दोन पिढ्यांमधील अंतर सांगणारी कथा!

‘सारखं काहीतरी होतंय’! ही घराघरातील गोष्ट आहे. घराघरात आईवडील आपल्या मुलांना मनापासून, स्वतःच्या आवडीनिवडी, परिस्थिती, त्रास सगळं बाजूला ठेऊन आनंदाच्या आणि सुखाच्या वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न करत असतातच. पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचा आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याच्या एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. जो दृष्टिकोन स्वाभाविकपणे आईवडिलांच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असतो. ह्या भिन्नतेचा एकमेकांशी वागण्यावर आणि प्रामुख्याने आपापसातल्या संवादावर कायम परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून दोन्ही पिढ्या आपापल्या पद्धतीने आणि ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ ने मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत असतात आणि घरात सारखं काहीतरी घडत असतं, हीच या नाटकाची गोष्ट आहे.

‘नात्यातील गमती-जमती, दोन पिढ्यांच्या विचारांतील विसंगती, करिअर आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ करत गुंफलेली कथा प्रत्येक घराची असून, प्रत्येकजण या कथेशी एकरूप होईल’, असा विश्वास निर्माते-अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. ‘रुसवे-फुगवे यात नात्याची खरी मजा दडली आहे. आमच्या केमिस्ट्रीमधून हीच मजा प्रेक्षकांना घेता येईल’, असं अभिनेत्री वर्षा उसगांवकर सांगतात. दिग्दर्शकीय पदार्पणातच दोन दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद आणि नाटकाची धमाल मेजवानी याचं समाधान लेखक-दिग्दर्शक संकर्षण कर्‍हाडे याने व्यक्त केलं आहे.

शुभारंभाचे प्रयोग रंगणार!

प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांच्यासोबत या नाटकात पूर्णिमा अहिरे-केंडे, सिद्धी घैसास, राजसिंह देशमुख आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. शुक्रवार 25 मार्चला दुपारी 4.30 वा. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह, बोरीवली येथे रंगणार आहे. शनिवार 26 मार्चला रात्रौ 8.30वा. विष्णुदास भावे, वाशी, तर रविवार 27 मार्चला सायं 7.30 वा. सावित्रीबाई फुले नाटयगृह, डोंबिवली येथे प्रयोग होणार आहे. सोमवार 28 मार्चला रात्रौ 8.30 गडकरी रंगायतन ठाणे आणि मंगळवार दुपारी 4.30 वा. दीनानाथ विलेपार्ले या नाटयगृहातही शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget