Pushpa 2 : ‘पुष्पा’ नाकारला तरीही ‘पुष्पा 2’कडून ऑफर! अल्लू अर्जुनच्या चित्रपटात समंथाची जागा घेणार 'ही' अभिनेत्री?
Disha Patani : अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूवर चित्रित झालेले आयटम साँग ‘ऊ अंटवा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे.
![Pushpa 2 : ‘पुष्पा’ नाकारला तरीही ‘पुष्पा 2’कडून ऑफर! अल्लू अर्जुनच्या चित्रपटात समंथाची जागा घेणार 'ही' अभिनेत्री? Disha Patani Set to Replace Samantha Ruth Prabhu in Pushpa 2 Item Song Pushpa 2 : ‘पुष्पा’ नाकारला तरीही ‘पुष्पा 2’कडून ऑफर! अल्लू अर्जुनच्या चित्रपटात समंथाची जागा घेणार 'ही' अभिनेत्री?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/4f42f7e33cf9359ce4819d2d8e544d40_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pushpa 2 Update : अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa :The Rise) चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन आता जवळपास 3 महिने उलटून गेले आहेत आणि चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाचे थरारक कथानक सर्वांनाच आवडले आहे. अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) चित्रित झालेले आयटम साँग ‘ऊ अंटवा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे.
मात्र, आता अशी चर्चा सुरु आहे की, ‘पुष्पा 2’मधून (Pushpa 2) समंथा बाहेर पडली आहे. तर, ‘पुष्पा 2’ या आगामी चित्रपटात समंथा ऐवजी नव्या आयटम साँगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री झळकणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटातील समंथाची जागा आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) घेणार आहे. अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा : द राईज’मधील आयटम साँग करण्यास नकार देणारी दिशा पाटनी आता दुसऱ्या भागात आयटम साँग करताना दिसणार आहे. ‘पुष्पा 2’ मध्ये हा बदल करण्याचा निर्णय दिग्दर्शक सुकुमार यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.
‘ऊ अंटवा’मुळे समंथा चर्चेत!
अलीकडेच, समांथाने तिचे आयटम साँग लोकप्रिय झाल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाली की, ‘केवळ तेलुगू प्रेक्षकच नाही, तर देशभरातील लोक मी केलेले इतर चित्रपट विसरले आहेत. परंतु, त्यांनी मला ऊ अंटवा गाण्यासाठी लक्षात ठेवले आहे.’
या गाण्याबद्दल सांगताना समंथा म्हणाली की, ‘हे गाणे करण्यासाठी मी तयार नव्हते. अशा प्रकारचं गाणं मी आधी कधीच केलं नव्हतं. पण, अल्लू अर्जुननं मला खूप समजावलं. त्याच्या प्रोत्साहनाशिवाय मी हे गाणं स्वीकारलंच नसतं. आता हे गाणं देशभरात व्हायरल झालं आहे, तेव्हा मला अल्लू अर्जुनचे आभार मानले पाहिजेत.’
दिशा आणि समंथाकडे चित्रपटांची रांग!
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, दिशा पाटनी लवकरच मोहित सुरीच्या एक व्हिलन रिटर्न्समध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय, ती सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तर, समंथा रुथ प्रभू, ‘यशोधा’, ‘काथुवाकुला रेंडू काधल’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. समंथाही तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. अलीकडेच वरुण धवनसोबत दिसल्यानंतर या अभिनेत्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि तेव्हापासून चाहते तिच्या नव्या बॉलिवूड प्रोजेक्टच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहोत.
हेही वाचा :
- Sonam Kapoor Pregnancy: कुणी तरी येणार गं.... सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
- RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)