Samantha Ruth Prabhu Trolling: ट्रोलर म्हणाला, घटस्फोटीत अन् सेकंड हँड; समंथाचं उत्तर अन् बोलतीच बंद
अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
![Samantha Ruth Prabhu Trolling: ट्रोलर म्हणाला, घटस्फोटीत अन् सेकंड हँड; समंथाचं उत्तर अन् बोलतीच बंद samantha ruth prabhu Trolling troller called her divorced second hand item samantha give reply Samantha Ruth Prabhu Trolling: ट्रोलर म्हणाला, घटस्फोटीत अन् सेकंड हँड; समंथाचं उत्तर अन् बोलतीच बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/092d1f4bc425910edb352be70d4e1943_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samantha Ruth Prabhu Trolling : अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या. काही नेटकऱ्यांनी समंथाला तेव्हा ट्रोल देखील केले होते. नुकतीच एका ट्रोलरने समांथाला कमेंट केली आणि तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण समांथाने त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आणि त्याची बोलती बंद केली.
काही दिवसांपूर्वी ट्वीटरवर एका यूझरने समंथाला 'घटस्फोटीत आणि सेकंड हँड आयटम' असं म्हटलं. एवढंच नाही तर या ट्रोलरने आणखी एक ट्वीट केले. त्याने त्या ट्वीटमध्ये लिहिले, 'अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट केल्यानंतर 50 कोटी रूपये समंथाने लूटले आहेत.' या ट्रोलरला कमेंट करत समंथाने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने या उत्तर दिले, ‘गॉड ब्लेस यूअर सोल’ अनेकांनी समंथाच्या या उत्तराचे सोशल मीडियवर कौतुक केले.
View this post on Instagram
समंथा आणि नागा चैतन्यची अशी होती लव्ह स्टोरी
‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)