Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल
![Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री deepika padukone priyanka chopra kangana ranaut katrina kaif to alia bhatt highest paid bollywood actresses Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/dba9134f9d167d1bfd52f24ebfc5dc4d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bollywood Actress : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधींचे मानधन घेतात. या अभिनेत्रींच्या चित्रपटांना त्यांच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. या अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.जाणून घेऊयात या अभिनेत्रींच्या मानधनाबाबत...
दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
अभिनेत्री दीपिका पादुकोणचा चाहता वर्ग मोठा आहे. ती एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 15 ते 30 कोटी मानधन घेते. दीपिका तिचे मानधन चित्रपटतील भूमिकेवरून ठरवते. लवकरच दीपिका 83 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिने कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे.
कंगन रनौत (Kangana Ranaut)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगन रनौत तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगना एका चित्रपटाचे 15 ते 27 कोटी रूपये मानधन घेते.
आलिया भट्ट (Alia Bhatt)
अभिनेत्री आलिया भट्टच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. सध्या आलिया आणि अभिनेता रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आलिया एका चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल 23 कोटी रूपये मानधन घेते. लवकरच आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन,मौनी रॉय आणि नागार्जुन हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा 15 तो 20 कोटी मानधन एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी घेते.
कतरिना कैफ (katrina kaif)
अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. रिपोर्टनुसार, कतरिना 21 कोटी रूपये एका चित्रपटासाठी मानधन घेते.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)