एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : समंथा रुत प्रभूही करणार दुसरं लग्न? 'या' व्यक्तीने केलं प्रपोझ; नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुत प्रभूला एका व्यक्तीने लग्नासाठी मागणी घातली आहे, यानंतर आता ती दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचे कोट्यवधी चाहते आहेत. समंथा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. अलिकडे समंथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य याने शोभिता धुलिपालीसोबत गुपचुप साखरपुडा उरकल आहे. त्यामुळे समंथा रुत प्रभूही पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. समंथाचे चाहते आणि हितचिंतक तिला खूप प्रेम आणि समर्थन पाठवत आहेत. 

समंथा रुत प्रभूही करणार दुसरं लग्न? 

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांची जोडी सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल्सपैकी एक होती. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य 2021 मध्ये विभक्त झाले. आता दोघेही स्वत: च्या आयुष्यात पुढे जाताना दिसत आहेत. समंथा रुथ प्रभू आजारपण आणि घटस्फोटाला मागे टाकत पुन्हा एकदा करिअरवर फोकस करताना दिसत आहे. एकीकडे नागा चैतन्यने साखरपुडा उरकल्यानंतर आता समंथाही दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. समंथाला एका व्यक्तीने लग्नासाठी प्रपोझही केलं आहे, त्यानंतर समंथा लग्नासाठी तयार होईल का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

'या' व्यक्तीने केलं प्रपोझ

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य नुकतेच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत एंगेजमेंट केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, त्याचवेळी समंथा रुथ प्रभू एका खास कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सोशल मीडियावर एक रील व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती समंथाला प्रपोज करतो आणि त्याच्याशी लग्न करण्याची विनंती करतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Mukesh Chintha (@mooookesh)

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्री पुन्हा चर्चेत

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर समंथानेही प्रतिक्रिया दिली आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या एंगेजमेंटच्या एका दिवसानंतर, एका इंस्टाग्राम युजरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक रील शेअर केला, ज्यामध्ये तो आपली बॅग पॅक करताना आणि समंथाला प्रपोज करण्यासाठी तिच्या घरी जाताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया युजरने व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं आहे, 'समंथाकडे जात आहे आणि तिला सांगत आहे की, तिला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी नेहमीच तिच्यासोबत असेन.' व्हिडीओमध्ये या तरुणाने गुडघे टेकून समंथाला प्रपोजही केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या रिलवर समंथाने कमेंट केली आहे. यामुळे चाहत्यांचं याकडे लक्ष वेधलं आहे.

समंथाच्या कमेंटने वेधलं लक्ष

फिटनेस फ्रीक समंथा रुथ प्रभूने व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये जिम पाहिली आणि कमेंटमध्ये म्हटलं आहे की, 'बॅकग्राउंडमध्ये दिसलेल्या जिमने मला जवळजवळ खात्री दिली आहे.' दरम्यान, व्हिडीओवर कमेंट करणाऱ्या काही चाहत्यांनी त्या व्यक्तीला समांथासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.

2021 मध्ये समंथा आणि नागा चैतन्य विभक्त

समंथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये लग्न केले आणि 2021 मध्ये ते विभक्त झाले. गेल्या वर्षी, समंथाने उघड केले की तिला मायोसिटिस, एक ऑटोइम्यून रोग असल्याचे निदान झाले आहे. तिने कामातून ब्रेक घेतला पण आता ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल: हनी बनी' या ॲक्शन मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mukesh Khanna : 'अक्षय कुमारला पकडून मारलं पाहिजे', मुकेश खन्ना 'खिलाडी'सह शाहरुख-अजयवर भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget