Mukesh Khanna : 'अक्षय कुमारला पकडून मारलं पाहिजे', मुकेश खन्ना 'खिलाडी'सह शाहरुख-अजयवर भडकले
Mukesh Khanna On Pan Masala Advertisement : अभिनेते मुकेश खन्ना यांनी पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे तीन सुपरस्टार अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : 'शक्तिमान' आणि 'महाभारत'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना फटकारण्याची भाषा केली आहे. छोट्या पडद्यावरील भीष्म पितामह अर्थात अभिनेते मुकेश खन्ना गेल्या काही काळापासून विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेते मुकेश खन्ना यांनी पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूडचे तीन सुपरस्टार अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पान मसाला जाहिरातींवर मुकेश खन्ना संतप्त
अभिनेते मुकेश खन्ना यांनी अलिकडेच त्यांच्या एका मुलाखतीत पान मसाला जाहिरातींवर भाष्य केलं आहे. तसेच मुकेश खन्ना यांनी कलाकारांना विनंती केली आहे की, जाहिरातींच्या नावाखाली पान मसाला, जुगार आणि बेटिंग ॲप्सचा प्रचार करू नये. अशा जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना फटकारलं पाहिजे असं, मुकेश खन्ना यांनी'बॉलीवूड बबल'शी बोलताना म्हटलं आहे. मुकेश खन्ना यावेळी म्हणाले की, "तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेन की, अक्षयला पकडून मारले पाहिजे. हेही मी त्यांनाही सांगितलं आहे."
मुकेश खन्नानं अक्षय कुमारला फटकारलं
मुकेश खन्ना यांनी सांगितलं की म्हणाला, अक्षय कुमार आरोग्याबद्दल खूप जागरूक आहे आणि मी त्यालाही फटकारलं आहे. अजय देवगण आणि आता शाहरुख खान पान मसाल्याच्या जाहिरातील झळकले आहेत, त्यावरही त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "अशा जाहिराती करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात आणि तुम्ही लोकांना काय शिकवता? ते लोक म्हणतात की आम्ही पान मसाला विकत नाही. ते म्हणतात सुपारी आहे, पण ते काय करत आहेत, हे त्यांना माहीत आहे."
मद्य कंपन्यांच्या जाहिरातींचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो यावर चर्चा करताना मुकेश खन्ना म्हणाले, "तुम्ही किंगफिशरची जाहिरात करता याचा अर्थ असा होतो की, तुम्ही किंगफिशरची बिअर विकत आहात. याला दिशाभूल करणारी जाहिरात म्हणतात, हे सर्वांना माहीत आहे. ते ही जाहिरात का करतात? तुमच्याकडे पैसे नाहीत का? हे काम करू नका, असं मी त्यांना सांगितलं आहे. तुमच्याकडे खूप पैसा आहे.
मुकेश खन्ना यांनाही पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर
मुकेश खन्ना यांनी यावेळी सांगितलं की, मी आयुष्यात कधीही सिगारेट आणि पान मसाला सारख्या गोष्टींची जाहिरात केली नाही. या सगळ्यासाठी मोठी रक्कम देऊ केली जाते. मलाही अशा ऑफर आल्या होत्या, पण या गोष्टी वाईट आहेत आणि मी त्यांचा प्रचार करू शकत नाही. मी सर्व मोठ्या कलाकारांना विनंती करतो की असे करू नका, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :