एक्स्प्लोर

लॉकडाऊनने केली 'मोस्ट वाँटेड भाई'ची गोची

लॉकडाऊनचे थेट परिणाम अनेक क्षेत्रांवर आणि दैनंदिन जीवनावर झाले. कोरोनामुळं निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका आणखी एका व्यक्तीलाही बसला आहे

मुंबई : 'राधे - युवर मोस्ट वाँटेड भाई' हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 13 मेला हा चित्रपट येतो आहे. सिनेमाची गाणी, ट्रेलर सगळं लोकांसमोर आहे. सलमान खानचा चित्रपट असल्यामुळे हा सिनेमा आता हिट होणार अशी भाकितं वर्तवली जात होती. अर्थात सिनेमा आल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या भाईला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यापैकी पहिली मोठी अडचण आहे ती थिएटर्सची. 

राधे.. युवर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट झी प्लेक्ससह भारतातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. एकाचवेळी ओटीटी आणि थिएटर अशा दोन्ही स्तरांवर हा चित्रपट येणार असल्याने थिएटरवाले नाराज झाले होते. कारण लोकांना थिएटरमध्ये हमखास खेचणारे जे काही मोजके चित्रपट आहेत, त्यातला एक राधे असं मानलं जात होतं. राधेच्या निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मल्टिप्लेक्सवाले नाराज झाले. त्यांनी हा चित्रपट न लावण्याचा अलिखित निर्णय घेतला असल्याचं इंडस्ट्रीत बोललं जात होतं. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. सिंगल स्क्रीनमध्ये तर सिनेमा लागायचा प्रश्नच नव्हता. शिवाय, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा जायची शक्यता हळूहळू संपत चालली होती. 

असं असताना भारतात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू लागले. महाराष्ट्राने तर लॉकडाऊन लावला होताच. पण आता कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी लॉकडाऊन लागले आहेत. साहजिकच तिथली थिएटर्स बंद झाली आहेत. त्यामुळे राधेच्या निर्मात्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. राधे हा चित्रपट ओटीटीवर येतानाच किमान 1000 स्क्रीन्सवर लावायचा अशी तयारी करण्यात आली होती. पण आता थिएटर्सच बंद असल्यामुळे या स्क्रीन्स कमी होणार आहेत. शिवाय, ज्या स्क्रीन्सवर चित्रपट लागेल, तिथे लोक जाऊन हा सिनेमा पाहतील की नाही अशी शंका आहे. कारण, देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता सध्या कोणीच थिएटरवर जाणार नाही अशी स्थिती आहे. असं असताना कलेक्शन कुठून येणार यावर राधेच्या गोटात खल चालू आहे. 

मिळालेल्या माहीतीनुसार राधे आणि निर्माती कंपनी झी.. यांच्यातही पुन्हा एकदा वाटाघाटी चालू असल्याचं कळतं. झी ने हा चित्रपट तब्बल 230 कोटी रुपये देऊन घेतला आहे. पण आता बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा पाहता झी प्लेक्सवरच सर्वांना अवलंबून राहावं लागणार आहे. राधे हा चित्रपट जगभरात रिलीज होतो आहे हे जरी खरं असलं तरी भारतातलं त्याचं गणित कोलमडण्याच्या अवस्थेत असल्याचं काही सिनेअभ्यासक सांगतात. 

नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबईतले एक हिंदी सिनेविश्वातले अनुभवी  वितरक म्हणाले, सलमानचा चित्रपट थिएठरमध्ये जाऊन बघणारा प्रेक्षक मोठा आहे. पण थिएटर्सची सध्याची अवस्था बिकट आहे. मोबाईलवर तो उपलब्ध झाला आहे. पण तिथे बघून सिनेमॅटिक अनुभव घेता येत नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सिनेमा पाहिला जाईल पण त्याचा परिणाम कितपत साधला जाईल यात शंका आहे. 

पायरसीचा धोका आहेच
राधे -युवर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट झी प्लेक्सवर येणार आहेच. पण या सिनेमाची पायरसी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपल्याकडे अनेक ऑनलाईन रिलीज झालेले चित्रपट नंतर इतर एप्सवर आले. सेक्रेड गेम्सही यातून सुटला नाही. अशावेळी राधे ऑनलाईन आल्यावर पुढच्या काही तासांत त्याची पायरसी होईल. ती झाली तर निर्मात्यांना मिळणारे पैसे कमी होत जातील. तोही एक धोका आहे, असंही हा वितरक म्हणाला. म्हणूनच सलमान आणि निर्माती कंपनी यांच्यातल्या कराराचाही फेरविचार करण्याबद्दल विचारविनिमय सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
Swapnil Joshi on Accident: स्वप्नील जोशीचा अपघात झाला? गंभीर दुखापत? नेमकं सत्य काय? अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत सगळं खरं सांगितलं
स्वप्नील जोशीचा अपघात झाला? गंभीर दुखापत? नेमकं सत्य काय? अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत सगळं खरं सांगितलं
Actress Maera Mishra Welcome Baby Girl: 'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
Nivedita Saraf: 'माझ्या पतीमुळे मी श्री स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली'; निवेदिता सराफ यांचं स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रूप चर्चेत' अक्कलकोटचा प्रसंग सांगताना झाल्या भावूक
'माझ्या पतीमुळे मी श्री स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली'; निवेदिता सराफ यांचं स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रूप चर्चेत' अक्कलकोटचा प्रसंग सांगताना झाल्या भावूक

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
Embed widget