Salman Khan On Suniel Shetty : सलमान म्हणाला, 'कपडे खरेदी करायला देखील नव्हते पैसे, सुनिल शेट्टीनं शर्ट दिला'
सलमाननं अभिनेता सुनिल शेट्टीनं (Suniel Shetty) केलेल्या मदतीबाबत देखील सांगितलं.

Salman Khan On Suniel Shetty : बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमानचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत. एका मुलाखतीमध्ये सलमाननं त्याच्या आयुष्यात आलेल्या कठिण प्रसंगाबाबत सांगितलं. सलमाननं अभिनेता सुनिल शेट्टीनं (Suniel Shetty) केलेल्या मदतीबाबत देखील सांगितलं.
मुलाखतीमध्ये सलमान म्हणाला, 'एक काळ असा होता, जेव्हा माझ्याकडे जास्त पैसे नव्हते. मझ्याकडे साधी पँट खरेदी करण्यासाठी पैसे होते. पण त्या काळात स्टोन वॉश जीन्सची नवी फॅशन आली होती. मी एका प्रसिद्ध कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो आणि स्टोन वॉश जीन्स आणि शर्ट मी तिथे पाहिला. माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. माझ्यासोबत तेव्हा सुनिल शेट्टी होता. तेव्हा सुनिलनं माझ्यासाठी तो शर्ट खरेदी केला आणि मला तो गिफ्ट म्हणून दिला. '
सलमान पुढे म्हणाला, 'सुनिलनं मला एक वॉलेट देखील त्यावेळी गिफ्ट दिलं होतं. त्यानं पाहिलं की मी एक वॉलेट बघत होते पण ते मी खरेदी केलं नाही. त्यानंतर सुनिल मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्याकडे जे वॉलेट होतं ते त्यानं मला गिफ्ट म्हणून दिलं.'
IIFA Awards 2022 चं सलमाननं सूत्रसंचालन केलं. लवकरच सलमानचे काही आगामी चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कभी ईद कभी दिवाली, टायगर-3 या सलमानच्या आगामी चित्रपटांची वाट सलमानचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. टायगर-3 हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा:
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Kangana Ranaut : कंगनाला 'धाकड'मुळे बसला मोठा फटका; 'तेजस' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
- Get Well Soon शाहरुख; ममता बॅनर्जींनी ट्वीट करत किंग खानसाठी केली प्रार्थना
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















