एक्स्प्लोर

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'मृत्यूचक्र' या मराठी थ्रिलरमध्ये अभिनेते शशांक शेंडे यांची मुख्य भूमिका आहे.

MrutyuChakra Shashank shende: प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात अन् नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेते शशांक शेंडे (Shahshank Shende) यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये (Marathi Thriller) काम केलं.  त्यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता अभिनेते शशांक हे आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच 'मृत्यूचक्र' (MrutyuChakra) या मराठी थ्रिलर चित्रपटातील शशांक शेंडे यांचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे. हा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाची स्टोरी काय असेल? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

'मृत्यूचक्र' या मराठी थ्रिलर सिनेमाचा फर्स्ट लूक समोर (MrutyuChakra Shashank shende in mysterious look)

श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी केलं आहे. तर, या चित्रपटाची निर्मीती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. ‘मृत्यूचक्र’ या सिनेमात अभिनेता शशांक शेंडे यांची मुख्य भूमिका आहे. ‘मृत्यूचक्र’मध्ये ते ‘जना काका’ ही व्यक्तिरेखा साकारत असल्याची माहिती आहे.  गावाकडच्या वातावरणाशी घट्ट जोडलेला, मनमोकळा, आपुलकीचा आणि मिश्कील स्वभावाचा जना काका म्हणजेच शशांक शेंडे प्रेक्षकांना अगदी ओळखीचा आणि आपलासा वाटणारा असा आहे.

पण ‘मृत्यूचक्र’मध्ये प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशी नाहीये. अन् जना काका त्याला अपवाद नाहीत. जना काकांच्या सहज बोलण्यात, मिश्कील वागण्यात आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या नजरेत काहीतरी दडलं आहे. त्यांच्या भोवती घडणाऱ्या घटना जसजशा गूढ होत जातात, तसतसा जना काकांचा खरा चेहरा जाणून घेण्याची उत्सुकता ही वाढत जाते. शशांक शेंडे यांनी या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयाची एक वेगळीच धार दिली आहे. विनोद, सहजपणा आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ असलेला जना काका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करतील, यात शंका नाही.

दरम्यान, जना काका खरंच इतके साधे आहेत का? की त्यांच्या शांत चेहऱ्यामागे ‘मृत्यूचक्र’ची एखादी महत्त्वाची कडी दडली आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांना ‘मृत्यूचक्र’ हा सिनेमा  पाहावंच लागेल. ‘मृत्यूचक्र’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, सध्या या सिनेमाचा फर्स्ट लूक व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget