Salman Khan : समंथाच्या 'या' गाण्यानं सलमान झाला प्रेरित; व्हिडीओ शेअर करुन समंथानं दिली हटके रिअॅक्शन
समंथानं सलमान खानचा (Salman Khan) एक व्हिडीओ शेअर केला आहे.
![Salman Khan : समंथाच्या 'या' गाण्यानं सलमान झाला प्रेरित; व्हिडीओ शेअर करुन समंथानं दिली हटके रिअॅक्शन salman khan say oo antava inspired him samantha rukh prabhu share video Salman Khan : समंथाच्या 'या' गाण्यानं सलमान झाला प्रेरित; व्हिडीओ शेअर करुन समंथानं दिली हटके रिअॅक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/27/79b78df488643a994d8467f29311dd94_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samantha Rukh Prabhu, Salman Khan : अभिनेत्री समंथाचा (Samantha Ruth Prrabhu) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या नृत्यशैलीला आणि अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटामधील 'Oo Antava' या गाण्यामधील समंथाच्या डान्सनं अनेकांची मनं जिंकली. आता या गाण्याचा बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा फॅन झाला आहे. समंथानं सलमान खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा एका मुलाखतीमध्ये 'Oo Antava' या गाण्याबद्दल सांगताना दिसत आहे.
आयफा पुरस्कार सोहळ्याला सलमाननं हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान एका मुलाखतीमध्ये सलमानला एक प्रश्न विचारण्यात आला. ' गेल्या वर्षी रिलीज झालेल्या कोणत्या गाण्यानं तुला प्रेरणा मिळाली?' या प्रश्नाचं सलमानानं, 'Oo Antava' असं उत्तर दिलं. हा सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ रिट्वीट करुन समंथानं हटके रिअॅक्शन दिली. समंथानं सलमानचा व्हिडीओ रिट्वीट करुन कॅप्शनमध्ये तीन हार्ट इमोजींचा वापर करुन रिअॅक्शन दिली आहे.
पाहा व्हिडीओ:
♥️♥️♥️ https://t.co/UzkF0PVspl
— Samantha (@Samanthaprabhu2) June 26, 2022
माधुरी दीक्षित, रणवीर सिंग,आयशा सिंग, रश्मी देसाई, उमर रियाझ, मिस्टर फैसू, जॉर्जिया एंड्रियानी, उर्फी जावेद आणि नेहा कक्कर या कलाकरांनी देखील 'Oo Antava' या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘शकुंतला’, ‘यशोदा’ हे समंथाचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच समंथा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. असंही म्हटलं जात आहे.
पुष्पा चित्रपटातील गाण्यांना आणि चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर आता या पुष्पा द रूल पार्ट 2 हा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयकॉन आणि AA21 हे अल्लू अर्जनचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mahaminister : 11 लाखांच्या पैठणीचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणेंना; आता सुरू होणार 'खेळ सख्यांचा चारचौघींचा'
- Kon Honar Crorepati : अक्षय कदमचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? जाणून घ्या वडाळ्याच्या अक्षयचा हॉटसीटपर्यंतचा प्रवास
- Karkhanisanchi Waari : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)