(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : त्याच्यापेक्षा लॉरेन्स बिश्नोई चांगला, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने केली तुलना, अभिनेत्रीचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
Somy Ali On Salman Khan: सोमी अली पुन्हा एकदा सलमान खानबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. तिने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केली आहे.
Somy Ali On Salman Khan: सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) सध्या चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान या प्रकरणावरही ती अनेकदा भाष्य करते. एका पोस्टमध्ये तर तिने लॉरेन्स बिश्नोईसोबत (Lawrence Bishnoi ) बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता तिने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईसोबत केलीये.
IANS वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सोमी अलीने सलमान खानच्या नात्यावर भाष्य केलं. यावेळी सोमी अलीला विचारण्यात आले की सलमान खानचे त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्स संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांच्याशी चांगले संबंध आहे, पण तुझ्यासोबत नाही.. त्यावर तिने म्हटलं की, कारण सलमान जसा माझ्यासोबत वागला आहे, तसा तो कुणासोबतच वागलेला नाही. मला जितकं त्याने छळलं आहे, तितका त्याने संगीता आणि कतरिनाला त्रास दिलेला नाही. तसेच तिने लॉरेन्स बिश्नोईविषयी देखील भाष्य केलं आहे.
सलमान खानपेक्षा लॉरेन्स बिश्नोई बरा आहे!
सोमीने सलमानची तुलना लॉरेन्स बिश्नोईशी केली आणि म्हणाली की, त्याने माझ्यासोबत जे केले, मी म्हणू शकते की लॉरेन्स बिश्नोई त्याच्यापेक्षा चांगला आहे. यावेळी सोमीने सलमानने तिला एकदा कशी मारहाण केली होती आणि त्यावेळी त्याच्या घरातील नोकराने दरवाजा वाजवून तिला मारु नका अशी विनंती केली होती याविषयीही भाष्य केलं.
पुढे सोमीने म्हटलं की, एकदा तब्बू माझी अवस्था बघून रडली होती. माझी पाठ तेव्हा खूप दुखत होती आणि मी बेडवर फक्त पडून होते. तेव्हा तब्बूला खूप रडायला आलं होतं. पण सलमान काही केल्या तिला भेटायला आला नाही. अभिनेत्री सोमी अली 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. ती जवळपास आठ वर्षे सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Ritiesh Deshmukh : अमित आणि धिरज देशमुख विधानसभेच्या मैदानात! रितेश देशमुखची भावांसाठी खास पोस्ट