एक्स्प्लोर

Jitendra Awhad on Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांनी डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी हे पचनी पडतच नाही; 'कितने आदमी थे' डायलॉगच्या दाव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं

Jitendra Awhad on Sachin Pilgaonkar : ‘शोले’ चित्रपटातील अमजद खान यांच्या 'कितने आदमी थे' या डायलॉगच्या भारदस्त आवाजामागे माझी मेहनत होती, असे सचिन पिळगांवकर यांनी म्हटले होते.

Jitendra Awhad on Sachin Pilgaonkar : मराठी सिनेसृष्टीचे (Marathi Indusry) महागुरू म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी एका मुलाखतीत ‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना व्यवस्थित बोलता येत नसल्याचे सांगितले होते. अमजद खान ज्यावेळी डायलॉग बोलत होते, तेव्हा तो पातळ आवाजात ऐकू येत होता. याची जाणीव झाल्यानंतर सचिन पिळगांवकर यांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेलं आणि त्यांच्या आवाजातच पुन्हा तो डायलॉग बोलून घेतल्याचे त्यांनी म्हटले. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत सचिन पिळगांवकर यांच्यावर निशाणा साधलाय. 

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, शोले हा सिनेमा 1975 साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक-एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल. 

हे पचनी पडतच नाही

गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की,  गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य-आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगांवकर यांनी शिकवले. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील 1950-60 च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगांवकर याने संवादफेक किंवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत. आजही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंगला विसरूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले होते सचिन पिळगांवकर? 

सचिन पिळगांवकर यांनी मुलाखतीत म्हटले होते की, शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभं केलं आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे. त्यांना सांगितलं ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो. मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता आणि पहिला डायलॉग "कितने आदमी थे..." आधी त्यानं वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेलं. मी त्याला सांगितलं नाही, असं नाही. नीचे के सूर मे बोल. पट्टी पुरी नीचे कर. Because I Am A Singer Also. मला ऑक्टिम्स कळतात. त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे...", असं सचिन पिळगांवकर म्हणाले होते. 

आणखी वाचा

जेव्हा विराट कोहली आणि जिनिलियाची एक जाहिरात रात्रीतून बॅन करण्यात आली होती; कारण ऐकून सगळेच हैराण झाले होते

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget