Saiyaara Mohir Suri Film Fist Choice: 'सैयारा'साठी अहान-अनीत नव्हे, 'या' रियल लाईफ कपलला होती पहिली पसंती; दिग्दर्शकांचा खुलासा
Saiyaara Mohir Suri Film Fist Choice: 'सैयारा' सिनेमासाठी अहान-अनीत नाही, 'या' रियल लाईफ कपलला होती पहिली पसंती.

Saiyaara Mohir Suri Film Ahaan Panday And Aneet Padda Was Not Fist Choice: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'सैयारा' (Saiyaara Movie) धुमाकूळ घालतोय. नवखी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमानं भल्याभल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित या सिनेमानं भल्याभल्यांना पाणी पाजलं आहे. तसेच, या वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक ठरला आहे. या सिनेमानं पदार्पणातच अहान पांडे आणि अनित पड्ढा यांना स्टारडम मिळवून दिलं. मोहित सुरू दिग्दर्शित या रोमँटिक ड्रामानं नवीकोरी जोडी आणि क्लासी साऊंडट्रॅकनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का? या फिल्मच्या लीड रोलसाठी अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डाच (Aneet Padda) नाहीतर बॉलिवूडमधील रिअल लाईफ पॉवर कपलला (Real Life Power Couples In Bollywood) निर्मात्यांची पहिली पसंती होती.
'सैयारा'साठी 'हे' बॉलीवूड कपल पहिली पसंती
स्कूपहूपच्या वृत्तानुसार, 'सैयारा'साठी रिअल लाईफ कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) या बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपलला निर्मात्यांची पहिली पसंती होती. यापूर्वी, दोघांनीही 'शेरशाह'मध्ये त्यांची अद्भुत ऑन-स्क्रीन केमिस्ट्री दाखवली, ज्यामुळे त्यांनी केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाही तर, या चित्रपटातील त्यांचा ऑफ-स्क्रीन रोमान्स रिअल लाईफ वेडिंगपर्यंत पोहोचला. असं म्हटलं जातं की, निर्मात्यांनी अहान आणि अनितला फायनल करण्यापूर्वी कियारा आणि सिद्धार्थला विचारलं होतं, पण काही कारणास्तव पुढे काही होऊ शकलं नाही.

मोहित सुरी यांना 'सैयारा'साठी प्रसिद्ध स्टार्स कास्ट करायचे होते...
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक मोहित सुरी यांनी 'सैयारा' बनवताना घडलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. निर्माते आदित्य चोप्रा इंटरफेयर करेपर्यंत ते एखाद्या फेमस स्टार कपलला 'सैयारा'साठी कास्ट करण्याचा विचार करत होते, असंही त्यांनी सांगितलं.
मोहित सुरी म्हणाले की, आदित्य चोप्रा म्हणाले, "तुमचा चित्रपट ओळखीच्या चेहऱ्यांसह चालणार नाही, ही दोन तरुणांची कथा आहे. नवीन चेहरे कास्ट करूया." सध्या बॉक्स ऑफिसवर जे वातावरण सुरू आहे, त्या वातावरणात असा धोका कोण पत्करेल? असं सुरी यांनी विचारलं, तेव्हा आदित्य चोप्रा यांनी उत्तर दिलं, "मी करेन..." विश्वासाची ही झेप चांगलीच यशस्वी झाली."
मनोरंजक गोष्ट म्हणजे, मोहित सुरी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी यापूर्वी 2014 च्या हिट चित्रपट 'एक व्हिलन' मध्ये एकत्र काम केलं होतं. मोहित सुरी अनेकदा इमरान हाश्मी, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर सारख्या त्याच्या विश्वासू स्टार्ससोबत काम करण्यासाठी देखील ओळखले जातात. त्याच्या यशस्वी इतिहासामुळे, सिद्धार्थचा 'सैयारा'सोबत अगदी सहज जोडला जाईल, असं वाटत होतं. पण, नवीन कलाकारांच्या कास्टिंगनं सगळा खेळ बदलला.
'सैयारा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'सैयारा'च्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट तिकीट खिडकीवर विक्रमी कमाई करत आहे. अवघ्या 11 दिवसांतच या चित्रपटाने भारतात 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जबरदस्त वर्ड-ऑफ-माउथमुळे, हा रोमँटिक ड्रामा तिसऱ्या आठवड्यापर्यंत 300 कोटींचा आकडा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे. जर 'सन ऑफ सरदार 2' आणि 'धडक 2' सारख्या नवीन रिलीजपेक्षा तो चांगला कामगिरी करत राहिला तर 'सैयारा' थिएटरमध्ये 375 कोटी ते 400 कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















