एक्स्प्लोर

Saiyaara Box Office Collection Day 6: अहान-अनीतच्या 'सैयारा'समोर दिग्गजांनी गुडघे टेकले; सुपरफास्ट कमाईनं 'छावा'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर करणार?

Saiyaara Box Office Collection Day 6: 'सैयारा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपट दररोज छप्पडफाड कमाई करुन भल्याभल्या सुपरस्टार्सना मागे टाकत आहे.

Saiyaara Box Office Collection Day 6: अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) यांचा 'सैयारा' (Saiyaara Movie) हा चित्रपट आठवड्याच्या दिवसातही कमाल करतोय आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर (Indian Box Office) सातत्यानं आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित म्युझिकल ड्रामा असलेला रोमँटिक सिनेमा दररोज 20 कोटींहून अधिक कमाई करतोय. इतकंच नाही तर, या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या सुपरस्टारच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. बुधवारी म्हणजेच, सहाव्या दिवशी तर, 'सैयारा'नं बॉक्स ऑफिसवर छप्पडफाड कमाई केली आहे.  

'सैयारा'नं सहाव्या दिवशी किती कमाई केली?

नव्या स्टारकास्टच्या 'सैयारा'नं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. आठवड्याच्या दिवसांतच 'सैयारा' सिनेमा त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा जास्त कमाई करतोय. संध्याकाळच्या शोमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येनं येत आहेत आणि थिएटरबाहेर हाऊसफुल बोर्ड लावलेले दिसतायत. बऱ्याच वर्षांनंतर, एखाद्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची अशी क्रेझ पाहायला मिळतेय. यासोबतच, बॉक्स ऑफिसवर एखाद्या हिंदी सिनेमाला चांगले दिवस आल्यानं थिएटर मालकही खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय. 'सैयारा'नं निर्मात्यांचं बजेट कधीच वसूल केलं असून आता ते फक्त नफा पैसे कमावत आहेत. 'सैयारा'चं दररोजचं लाईफटाईम कलेक्शन तर एखाद्या वादळासारखं आहे. 

दुसरीकडे, हा चित्रपट 2025 च्या चित्रपटांना एकामागून एक ज्या वेगानं मागे टाकत आहे ते पाहता, लवकरच 'सैयारा'नं विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमालाही मागे टाकलं तर, आश्चर्य वाटणार नाही. दरम्यान, 'छावा' चित्रपटाच्या 600 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकण्यासाठी त्याला अजूनही अनेक कोटींची कमाई करावी लागणार आहे. या सगळ्यामध्ये, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टवर नजर टाकली तर, SACNILC च्या आकडेवारीनुसार

  • 'सैयारा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 21.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 33.75 कोटी कमावले.
  • चित्रपटानं चौथ्या दिवशी 24 कोटी आणि पाचव्या दिवशी 25 कोटी कमावले.
  • सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सैयारा'नं रिलीजच्या सहाव्या दिवशी 21 कोटी कमावले आहेत.
  • यासह, 'सैयारा'ची 6 दिवसांत एकूण कमाई आता 153.25 कोटी झाली आहे.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ahaan Panday (@ahaanpandayy)

'सैयारा' 2025 च्या टॉप 5 फिल्म्समध्ये झाली सामील 

'सैयारा' बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं कमाई करतेय आणि आपल्या धामाकेदार कमाईनं दररोज नवे विक्रम रचत आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशी, हा चित्रपट अक्षय कुमारच्या स्काय फोर्सच्या 134.93 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकत 2025 मधील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आता 'सैयारा'चं पुढचं टार्गेट 'सितारे जमीन पर' (164.67 कोटी) आहे. आता 'सैयारा'आणखी कोणकोणत्या सुपरस्टार्सचे रेकॉर्ड मोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saiyaara Starcast Fees: 'सैय्यारा' बॉक्स ऑफिसवर नॉन स्टॉप; डेब्यू फिल्मसाठी अहान पांडे, अनित पड्डाला किती पैसे दिले?

महत्त्वाच्या बातम्या

प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Pooja Sawant: मुलाची नाही, सासूची 'पत्रिका' पाहणार, मगच 36 गुण जुळणार; पूजा सावंतचा सिनेमा 'कप बशी' चर्चेत, कधी रिलीज होणार?
मुलाची नाही, सासूची 'पत्रिका' पाहणार, मगच 36 गुण जुळणार; पूजा सावंतचा सिनेमा 'कप बशी' चर्चेत, कधी रिलीज होणार?
Krushnaichya Leki:इन्फ्लुएन्सर नंदन कुंटेसोबत झी मराठीचा हटके प्रयोग; 'कृष्णाईच्या लेकी'च्या रीलने जिंकली प्रेक्षकांची मनं
इन्फ्लुएन्सर नंदन कुंटेसोबत झी मराठीचा हटके प्रयोग; 'कृष्णाईच्या लेकी'च्या रीलने जिंकली प्रेक्षकांची मनं
Raakh Review |8 एपिसोडचा हा क्राईम थ्रिलर डोकं भंजाळून सोडेल; 'पाताल लोक' लाही देतोय टक्कर ; OTT वर कुठे पहाल?
8 एपिसोडचा हा क्राईम थ्रिलर डोकं भंजाळून सोडेल; 'पाताल लोक' लाही देतोय टक्कर ; OTT वर कुठे पहाल?

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
Embed widget