Saiyaara Starcast Fees: 'सैय्यारा' बॉक्स ऑफिसवर नॉन स्टॉप; डेब्यू फिल्मसाठी अहान पांडे, अनित पड्डाला किती पैसे दिले?
Saiyaara Starcast Fees: म्युझिकल ड्रामा असलेल्या 'सैय्यारा' सिनेमानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. पण तुम्हाला माहितीय का? सुपरहिट सिनेमासाठी अहान पांडे आणि अनित पड्डाला किती पैसे दिले?

Saiyaara Starcast Fees: अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनित पड्डा (Aneet Padda) स्टारर 'सैय्यारा' (Saiyaara Movie) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर येताच अनेक रेकॉर्ड तोडले. म्युझिकल ड्रामा असलेल्या 'सैय्यारा' सिनेमानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. हे वर्ष सुरू झाल्यापासूनच अनेक सुपरस्टारचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले, पण जोरदार आदळले. अशातच दोन नवख्या स्टार्सचा 'सैय्यारा' (Saiyaara Movie Budget) तुफान कमाई करतोय.
बिग बजेट सिनेमा, त्या सुपरस्टार आणि भलेमोठे सेट... हे सूत्र वापरुनही यंदाच्या वर्षात मात्र सुपरस्टार्सचे सिनेमे जोरदार आदळले. पण, नव्यानं इंडस्ट्रीत आलेल्या अहान आणि अनित यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमानं सुपरस्टार्सचे धाबे दणाणून सोडले आहेत. पण, तुम्हाला माहितीय का? अहान आणि अनितनं 'सैय्यारा'साठी किती पैसे घेतलेत?
'सैय्यारा'नं धुरळा उडवला, नवखे कलाकार रातोरात झालेत स्टार
अहान आणि अनित दोघेही रातोरात स्टार झाले आहेत. यामुळे, प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलतोय. अहान आणि अनित यांच्या फीबाबत कोणताही अधिकृत डेटा समोर आलेला नाही.
पिंकव्हिलाच्या एका अहवालानुसार, जेव्हा मोठ्या आणि प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत नवे चेहरे लाँच केले जातात, तेव्हा त्यांना 3-5 कोटी फी मिळते. अहानची फी या आकड्यापेक्षा जास्त असू शकते, कारण तो बॉलिवूड स्टार चंकी पांडेचा पुतण्या आहे. अहानला अनितपेक्षा जास्त फी मिळाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
दिग्दर्शक मोहित सुरीनं किती पैसे घेतले?
'सैय्यारा' हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला. यामध्ये प्रमोशनसाठी मिळालेले पैसे देखील समाविष्ट आहेत. मोहित सुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि त्यांना चांगली रक्कमही मिळाली आहे. वृत्तानुसार, तो एका चित्रपटासाठी 6-8 कोटी रुपये घेतो, पण ते चित्रपटाच्या यशावर देखील अवलंबून असतं.
दरम्यान, 'सैय्यारा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं फक्त तीन दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत. चित्रपटानं तीन दिवसांत 83 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटानं 21 कोटी, दुसऱ्या दिवशी 19.05 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. 'सैय्यारा'नं बॉक्स ऑफिसवर अशीच घौडदौड सुरू ठेवली, तर चित्रपटाला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























