Saiyaara Box Office Collection Day 3: 'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, डेब्यूमध्येच अहान पांडे, अनीत पड्डानं धडाधड मोडले सलमान-शाहरुख-आमिरचे रेकॉर्ड्स
Saiyaara Box Office Collection Day 3: अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या 'सैयारा' चित्रपटानं तिसऱ्या दिवशीही कमाल केली. या चित्रपटानं केवळ त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली नाही, तर अनेक सुपरस्टारच्या चित्रपटांनाही मागे टाकलंय.

Saiyaara Box Office Collection Day 3: गेल्या कित्येक दिवसांत अनेक बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचे सिनेमे आले आणि गेले, पण फारशी चांगली कमाई करू शकले नाहीत. अक्षय कुमार, सलमान खानसारख्या सुपरस्टारचे सिनेमे तर आपलं बजेटसुद्धा वसूल करू शकले नाहीत. पण, नुकत्याच रिलीज झालेल्या अगदी नवख्या कलाकारांच्या एका सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवला आहे. आधी या सिनेमाकडे कुणी लक्षही दिलं नाही, पण या सिनेमानं पहिल्याच दिवशी बंपर गल्ला जमवला आणि आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलं.
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा म्युझिकल रोमँटिक ड्रामा 'सैयारा' सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. या सिनेमानं कित्येक सुपरस्टार्सच्या सिनेमांना मागे टाकलं आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं त्याच्या बंपर कमाईनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अपेक्षेप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही 'सैयारा'नं प्रचंड कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी तर या सिनेमानं बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना माना झुकवायला भाग पाडलं.
'सैयारा'नं तिसऱ्या दिवशी किती कमाई केली?
बड्या सुपरस्टारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जे करता आलं नाही, ते 'सैयारा' सिनेमानं केलं. नवखे सिनेस्टार्स असूनही विक्की कौशलच्या सुपरहिट 'छावा' नंतर, हा चित्रपट 2025 मध्ये तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालणारा दुसरा चित्रपट आहे. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलेलं असल्यानं, त्याबद्दल आधीच चर्चा होती.
चित्रपटगृहात दाखल झाल्यानंतर, अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या दमदार अभिनयानं सजलेल्या या चित्रपटाची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना आवडली आणि त्यानंतर तो पाहण्यासाठी लोकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. यासह, ब्लॉकबस्टर ओपनिंग असताना, दुसऱ्या दिवशीही 'सैयारा'नं चमत्कार केला आणि भरपूर कमाई केली. दोन दिवस उत्तम गल्ला जमवल्यानंतर 'सैयारा' विकेंडला काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं, पण तिसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी, 'सैयारा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाले तर, सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार...
- 'सैयारा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 21 कोटींचा व्यवसाय केला.
- दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 19.05 टक्के वाढ दाखवली आणि 25 कोटींची कमाई केली.
- त्याच वेळी, सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सैयारा'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी 37 कोटींची कमाई केली आहे,
- यासह, 'सैयारा'नं तीन दिवसांत 83 कोटींची कमाई केली.
'सैयारा'नं विकेंडला तर सुपरस्टार्स फिल्मसना मात दिली...
'सैयारा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या फिल्मच्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनच्या पुढे सलमान खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यासह कित्येक बडे सुपरस्टार्स फेल झालेत. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'सैयारा'नं तिसऱ्या दिवशी मोठी कमाई केली आहे.
- 'सिंघम अगेन'नं तिसऱ्या दिवशी 35.75 कोटी रुपये कमावले.
- 'धूम 3' चे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन 35.43 कोटी रुपये होते.
- 'भूल भुलैया 3' नं तिसऱ्या दिवशी 35.5 कोटी रुपये कमावले.
- 'चेन्नई एक्सप्रेस'नं तिसऱ्या दिवशी 32.5 कोटी रुपये कमावले.
- 'हाऊसफुल 5' चं तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन 32.5 कोटी रुपये होते.
- 'सुलतान'ने तिसऱ्या दिवशी 32.67 कोटी रुपये कमावले.
- 'आरआरआर'नं तिसऱ्या दिवशी 31.5 कोटींचा व्यवसाय केला.
- 'दबंग 3'नं तिसऱ्या दिवशी 30.9 कोटी रुपये कमावले.
- 'किक'चं तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन 30.18 कोटी रुपये होते
- 'प्रेम रतन धन पायो'नं तिसऱ्या दिवशी 30.7 कोटी रुपये कमावले.
- 'साहो'नं तिसऱ्या दिवशी 29.48 कोटी रुपये कमावले.
- 'गोलमाल अगेन'चं तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन 29.09 कोटी रुपये होते.
- 'स्काय फोर्स'नं तिसऱ्या दिवशी 28 कोटी रुपये कमावले.
- 'कबीर सिंग'चा तिसऱ्या दिवसाचा व्यवसाय 27.91 कोटी रुपये होता.
- 'बागी 2' ची तिसऱ्या दिवसाची कमाई 27.6 कोटी रुपये होती.
- 'फायटर'नं तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी रुपये कमावले.
- 'दृश्यम 2'नं तिसऱ्या दिवशी 27.17 कोटी रुपये कमावले.
- 'सितारे जमीन पर'नं तिसऱ्या दिवशी 27 कोटी रुपये कमावले.
- 'की का भाई किसी की जान'नं 26.61 कोटी रुपये कमावले.
- 'कल्की 2898 एडी'नं तिसऱ्या दिवशी 26 कोटी रुपये कमावले.
- 'डॉंकी'ची तिसऱ्या दिवसाची कमाई 25.61 कोटी रुपये होती.
- 'सैयारा'ची पहिल्या आठवड्यात बजेटपेक्षा जास्त कमाई
'सैयारा'नं पहिल्या आठवड्यात इतिहास रचला. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या फक्त तीन दिवसांत 76 कोटींहून अधिक कमाई केली आणि त्याचा 60 कोटींचा खर्च वसूल केला. आता तो हिटचा टॅग मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. कोणत्याही चित्रपटाला हिट होण्यासाठी त्याच्या दुप्पट खर्चाची रक्कम गोळा करावी लागते. 'सैयारा' बॉक्स ऑफिसवर ज्या वेगानं कमाई करतोय, ते पाहता, तो रिलीजच्या पहिल्या आठवड्यात हिट होईल, असंच एकंदरीत चित्र दिसतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अहान पांडे, अनीत पड्ढाची कमाल, ह्रदयस्पर्शी लव्हस्टोरी; कसा आहे Saiyaara ? वाचा Review























