एक्स्प्लोर
MCA Election Row: 'असा कोणताही ठराव मंजूर नाही', MCA निवडणुकीवरून 28 Clubs आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला
मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) अर्थात MCA निवडणुकीच्या नियमांवरून वाद निर्माण झाला आहे. MCA ची आगामी निवडणूक ही बीसीसीआयच्या (BCCI) निवडणूक निकषांनुसार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, MCA च्या २८ सदस्य क्लब्सनी (Clubs) याला तीव्र विरोध केला आहे. 'एमसीएची आगामी निवडणूक ही एमसीएच्या घटनेनुसारच व्हावी,' अशी स्पष्ट मागणी या क्लब्सच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया (J. S. Saharia) यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. एमसीएच्या कार्यकारिणीने बीसीसीआयच्या नियमांनुसार निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर केल्याचे सांगण्यात आले होते, मात्र असा कोणताही ठराव मंजूर झाला नसल्याचा दावा या क्लब्सनी केला आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवरून MCA पदाधिकारी आणि सदस्य क्लब्समध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















